नाशिक - येथील त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा दावा पुजाऱ्यांनी केला आहे. Kitchen बर्फ जमा झाल्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
भारत चीन युद्धानंतर १९६२ मध्येही असाच बर्फ जमा झाल्याची नोंद होती. ईशान्य भारतातील आसाम राज्यात बहुतांश ठिकाणे पाण्याखाली गेल्यानंतर त्र्यंबकेश्वर मंदिरात पुन्हा पिंडीवर चमत्कारिक बर्फ आढळून आला आहे, अशी माहिती पुजाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान, याबाबत त्र्यंबकेश्वर मंदिरातील सीसीटीव्हीची तपासणी करून अधिकृत माहिती मंदिर प्रशासन देणार आहे. देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग म्हणून त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंग देशभरात ओळखले जाते. त्यामुळे या शिवलिंगावरील बर्फ पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.