अहमदनगर - जिल्ह्यातील अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील शहरामध्ये व सर्व तालुक्यामध्ये तसेच ब्लॅक स्पॉट असलेल्या ठिकाणी विशेष वाहन तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी दिली आहे.
या तपासणी दरम्यान विना हेल्मेट दुचाकी चालविणे, सिट बेल्ट न लावणे, वाहनाची कागदपत्रे वैध नसणे (पीयुसी, विमा, लायसन्स, परमीट, योग्यता प्रमाणपत्र व इतर), अतिवेगाने वाहन चालवणे धोकादायक पध्दतीने वाहन चालवणे, विना वाहन नोंदणी क्रमांक वाहन चालवणे तपासणी करण्यात येणार आहे.
तपासणी दरम्यान दोषी आढळऱ्या वाहन चालक व मालकांवर मोटार वाहन कायद्याअंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालवताना वाहनचालकांनी वाहनाची वैध कागदपत्रे सोबत बाळगावीत, असे आवाहनही करण्यात आले आहे.