मराठी पत्रकार परिषदेचे आदर्श तालुका, जिल्हा पुरस्कार वितरण ७ एप्रिलला

अहमदनगर - मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणार्‍या वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार आणि मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न तालुका अध्यक्षांचा मेळावा अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे ७ एप्रिल रोजी होत आहे. 

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस. एम. देशमुख यांनी ही घोषणा केली आहे. मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दरवर्षी उत्कृष्ट कार्य करणार्‍या तालुका पत्रकार संघांना वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्काराने आणि रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्काराने गौरविण्यात येते.

पुरस्कार वितरण सोहळे प्रामुख्याने ग्रामीण भागातच घेतले जातात. कर्जतला सकाळी १०.३० वाजता पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत सुरू होईल. आमदार रोहित पवार हे मेळाव्याचे स्वागताध्यक्ष आहेत.

या मेळाव्याला राज्यातून किमान ६०० प्रतिनिधी उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे. तसे नियोजन कर्जत आणि जामखेड येथील संयोजन समिती संयुक्तरित्या करीत आहेत. मेळाव्यास पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

मुख्य विश्‍वस्त एस.एम. देशमुख, विश्‍वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, पुणे विभागीय सचिव नाना कांबळे यांनी केले आहे. राज्यातील पत्रकारांच्या स्वागतासाठी उत्सुक असल्याचे मन्सुरभाई शेख यांनी सांगितले आहे.

पुरस्काराचे मानकरी तालुके - नागपूर विभाग: मोहाडी तालुका, जिल्हा भंडारा, अमरावती विभाग : धामणगाव तालुका, जिल्हा अमरावती, लातूर विभाग : औढा नागनाथ तालुका, जिल्हा हिंगोली, नाशिक विभाग: अमळनेर तालुका, जिल्हा जळगाव, पुणे विभाग: पुरंदर तालुका, जिल्हा पुणे, कोल्हापूर विभाग: जत तालुका, जिल्हा सांगली, औरंगाबाद विभाग : पैठण तालुका, जिल्हा औरंगाबाद, कोकण विभाग: महाड तालुका मराठी, जिल्हा रायगड.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !