महाराष्ट्र विधानसभा लक्ष्यवेधी प्रश्नोत्तरे

मुंबई - विधिमंडळ सभागृहात आज झालेल्या ठळक घडामोडी आणि कोण काय म्हणाले, ते आम्ही आपणास थोडक्यात सांगत आहोत.

राज्यातील औद्योगिक वसाहतीत अनुचित घटना टाळण्यासाठी तिथे अग्निशमन केंद्र असणे गरजेचे आहे. आगीसंदर्भात घटना घडल्यास तत्काळ परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी एमआयडीसी मध्ये अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी उद्योग विभाग पुढाकार घेईल. - उद्योगमंत्री उदय सामंत

पुणे मेट्रोचे काम सुरु असल्याने 'जुने शिवाजीनगर' बसस्थानकाच्या जागी नवीन बसस्थानक तयार करण्यासाठी एसटी महामंडळ आणि महामेट्रो यांच्यात ३ फेब्रुवारीला बैठक झाली असून यासंदर्भात पुन्हा एकदा बैठक घेण्यात येईल - मंत्री दादा भुसे

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ येत्या ३१ मार्चपर्यंत देण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांकडून बँकांना देण्यात आल्या आहेत. - मंत्री अतुल सावे

ग्रामीण भागातील विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गातील घटकांसाठी राज्यात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबविण्यात येत असून या योजनेबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. - सहकारमंत्री अतुल सावे

ठाणे येथील फ्लेमिंगो पार्कच्या संवर्धनासाठी राज्य शासनाकडून आराखडा तयार करण्यात येणार आहे. या आराखडा समितीमध्ये 'निरी' संस्थेतील तज्ज्ञांचा समावेश करुन हा आराखडा लवकरात लवकर केंद्र शासनाकडे पाठविणार आहे - मंत्री दीपक केसरकर

ठाणे महानगरपालिकेने शहरांतर्गत विविध विकास कामांची निविदा काढली. त्या अंतर्गत होणाऱ्या कामांची गुणवत्ता तपासणी त्रयस्थ संस्थेमार्फत करण्यात आली असून शहरातील विकास कामांची निविदा प्रक्रिया ही नियमानुसारच करण्यात आली आहे - मंत्री उदय सामंत
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !