बेल्हेकरवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी रुपाली शिंदे यांची बिनविरोध निवड

अहमदनगर - नेवासा तालुक्यातील बेल्हेकरवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी रुपाली संतोष शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड प्रक्रिया ग्रामपंचायतच्या नऊ सदस्यांच्या उपस्थितीमध्ये बिनविरोध पार पडली. बेबीताई कानिफनाथ येळवंडे यांनी दोन वर्ष सरपंचपद भुषवले.

गुरुवारी (दि. १६) रुपाली संतोष शिंदे यांनी सरपंचपदाचा पदभार स्विकारला. बेल्हेकरवाडी ग्रामपंचायतच्या सत्तातंरानंतर आतापर्यंत गावामध्ये अनेक प्रकारची विकासाची कामे झाली. यापुढे विकास कामे सुरुच राहतील असे अश्वासन रुपाली संतोष शिंदे यांनी दिले.

रुपाली शिंदे म्हणाल्या, गावातील ग्रामस्थांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी माजी सरंपच म्हणुन निवड केली. त्यांच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही. गाव एकत्र येऊन विकासाची कामे होऊ शकतात हा आदर्श आपण निर्माण करु. सर्वच राजकीय पदाधिकार्‍यांनी विकासासाठी सहकार्य करावे.

यावेळी उपसरपंच म्हणून ज्ञानेश्वर लोखंडे यांनी पदभार स्वीकारला. यावेळी दत्तात्रय बेल्हेकर, राजेंद्र शिंदे, लखन जगदाळे, कानिफनाथ येळवंडे, संतोष शिंदे, गणेश गडाख, गणेश शिंदे, तुकाराम शिंदे, दामोदर शिंदे, हे उपस्थित होते.


तसेच यावेळी ज्ञानदेव शिंदे, बाळासाहेब शिंदे, रामभाऊ शिंदे, भाऊसाहेब शिंदे, गावजी शिंदे, कैलास शिंदे, श्रीराम शिंदे, प्रल्हाद शिंदे, पांडुरंग बेल्हेकर (सर), शशिकांत बेल्हेकर, प्रवीण बेल्हेकर, संदीप सुदाम बेल्हेकर उपस्थित होते.

यांच्यासह सुरज शिंदे, राहुल शिंदे, अतुल शिंदे, जयदीप शिंदे, शुभम शिंदे, किरण शिंदे, अभिषेक शिंदे, सिध्दार्थ बेल्हेकर, सचिन बेल्हेकर, अशोक शिंदे,  योगेश शिंदे, उत्तम शिंदे, अरुण शिंदे, आबासाहेब शिंदे, आदी उपस्थित होते.

सोमनाथ शिंदे, अशोक शेटे, प्रतीक बेल्हेकर, बाजीराव बेल्हेकर, मधुकर बेल्हेकर, सोन्याबापू बेल्हेकर, शांताराम शिंदे, संजय शिंदे, कांतराम शिंदे, दिलीप शिंदे, महेश येळवंडे, भास्कर शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !