युनिक ब्रेन अकॅडमी आणि बायज्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने
5 मार्चला भव्य बक्षीस वितरण सोहळा
पाथर्डीफाटा, इंदिरानगर, सिडकोत आज दुसरे सत्र
नाशिक : युनिक ब्रेन अकॅडमीतील बालचमुंनी सुप्तगुणांना चालना देत उभ्या-आडव्या काळ्या रेषांचा संगम, कल्पनाशक्तीचा वापर करीत कलाविष्काराने तयार केलेले चित्र, त्यात विविधरंगी रंगछटांनी मढवून कोणी गुढीपाडवा, होळी तर कोणी रंगपंचमी या भारतीय संस्कृतीची नयनरम्य हुबेहूब चित्र रेखाटत एका अनोख्या चित्रसफरीची मैफिलच रंगवली.
एकाग्रतेने जीव ओतून आपलेच चित्र झकास करण्याची जणू काय शर्यतच आहे अशा भावनेने रंगविश्वात हरवलेल्या बालदुनियेचा नजारा रविवारी (ता. 26) युनिक ब्रेन अकॅडमीच्या नाशिक मधील विविध केंद्रावर 'युनिक चॅम्पस'नी प्रत्यक्ष अनुभवला. त्याला निमित्त होते ते महाराष्ट्रासह देशात विजयी घोडदौड करणारी ‘युनिक ब्रेन अकॅडमी’ आणि बायज्युज ट्युशन सेंटर (इंदिरानगर) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चित्रकला स्पर्धेचे.
युनिक अकॅडमीच्या पाथर्डी फाटा येथील वासननगर येथील प्रमुख गामणे ग्राउंड समोरील ब्रँच सह दामोधर चौकातील साईदीप क्लासेस ब्रँच, इंदिरानगर येथील वंडरलँड स्कुल ब्रँच, पांडव नगरी जवळील गोल्डन ग्लोबल स्कुल ब्रँच, सिडकोतील रुद्र प्रॅक्टिकल स्कुल मागील माणिकगर ब्रँच येथे अत्यंत शिस्तीने गटनिहाय बसलेले शिस्तप्रिय विद्यार्थी, टाचणी पडेल त्याचाही आवाज येईल एवढी शांतता, आपल्याला मिळालेल्या विषयाचे चित्र रंगविण्यात विद्यार्थी मग्न झाले होते.
विविधरंगी रंगछटांच्या आविष्काराला आकार देत अत्यंत हुबेहूब चित्र रंगविणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे जणू काय या सर्व युनिक ब्रँच मध्ये प्रांगणात कलाविश्वाचा मेळा भरल्याचे चित्र निर्माण झाले होते.
स्पर्धा यशस्वीपने पार पाडण्यासाठी युनिक ब्रेन अकॅडमीचे मॅनेजिंग डायरेक्टर गणेश अनपट, चीफ एक्झिक्युटीव्ह ऑफिसर कल्पना अनपट, एज्युकेशनल डायरेक्टर आशा अनपट यांच्यासह बायज्यूजचे मार्केटिंग मॅनेजर समीर बोरोले, बिजनेस डेव्हलपमेंट एक्झिकेटीव्ह नानाभाऊ अहिरे व मुकुंद लाडवंजारी यांनी परिश्रम घेतले.
पालकांचे विशेष अभिनंदन
युनिक अकॅडमीने कुठल्याही स्पर्धेची अगर 'इव्हेट'ची घोषणा करावी आणि युनिक कुटूंबातील पालकांनी ते शिवधनुष्य यथोचित पेलावे अशीच प्रचिती नेहमीच येते. आपली कामं, जबाबदाऱ्या यांची ऍडजेसमेंट करून मुलांना उत्स्फूर्तपणे स्पर्धेत सहभागी करण्यापर्यंतची तारेवरची कसरत पालक नेहमीच हिरीरीने पार पाडतात. सध्या परीक्षेचा काळ असतानाही विद्यार्थीरूपाने पालकांनी दिलेल्या उदंड सहभागाचे विशेष कौतुक. अशी मोलाची सहयोगाची भूमिका बजावून युनिक परिवाराची ताकद बनलेल्या गुणी, सहयोगि पालकांचे युनिक अकॅडमीचे मॅनेजिंग डायरेक्टर ऍड. उमेश अनपट सह सर्व डायरेक्टर्स यांनी मनःपूर्वक अभिनंदन करून ऋण व्यक्त केले.
आकर्षक बक्षिसांची लयलूट
युनिक ड्रॉईंग कॉम्पिटिशन मध्ये सहभागी बाल चित्रकारांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी प्री- प्रायमरी गट, पहिली ते पाचवी गट आणि सहावी च्या पुढील गट अशा तीन विभागात प्रत्येक ब्रँच निहाय प्रथम, द्वितीय आणि तृतीय बक्षीस दिले जाईल. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यास सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.
5 मार्चला बक्षीस वितरण
येत्या रविवारी, 5 मार्चला पाथर्डी फाटा मुरलीधरनगर येथील शेलार सभागृहात विविध मान्यवरांच्या हस्ते भव्य बक्षीसवितरण व गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी नॅशनल अबॅकस कॉम्पिटिशन, युनिक प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आणि युनिक चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा आकर्षक गिफ्ट्स, ट्रॉफी, मेडल्स आणि प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात येईल.
दुसऱ्या सत्रात सहभागी होण्याची संधी
युनिक चित्रकला स्पर्धेच्या दुसऱ्या सत्रात आज, सोमवारी (ता. 27 ) पाथर्डी फाटा येथील वासननगर येथील प्रमुख गामणे ग्राउंड समोरील ब्रँच येथे सायंकाळी 7 ते 8, इंदिरानगर मधील पांडव नगरी जवळील गोल्डन ग्लोबल स्कुल ब्रँच मध्ये सायंकाळी 6:30 ते 8:30 आणि सिडकोतील रुद्र प्रॅक्टिकल स्कुल मागील माणिकगर ब्रँच मध्ये सायंकाळी 7 ते 8 यावेळेत आयोजन करण्यात आले आहे. युनिक ब्रेन अकॅडमी च्या राहिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या जवळील ब्रँच मध्ये आज सहभाग नोंदवून या चित्रसफरीत सहभागी व्हावे.