स्पेशल मध्यस्थी ट्रेनरपदी ऍड वाडेकर, खराडे व उनवणे यांची निवड

अहमदनगर - नुकतीच महाराष्ट्र गोवा बार कौन्सिल तसेच दि मेडिएशन अँड कॉन्सिलेशन प्रोजेक्ट कमिटी सर्वोच्च न्यायालय न्यू दिल्ली यांच्या वतीने देण्यात आलेल्या स्पेशल मेडिएशन ट्रेनिंग मध्ये ऍड विक्रम लक्ष्मण वाडेकर, ऍड पंकज पद्माकर खराडे व ऍड अरुणा देवराम उनवणे/राशिनकर यांची निवड झाली.

या सर्वांची स्पेशल मध्यस्थी ट्रेनर म्हणून निवड झालेली आहे. त्याबाबतचे नियुक्तीचे प्रमाणपत्र औरंगाबाद येथे महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे माजी चेअरमन व सदस्य ऍड व्ही डी साळुंखे व सदस्य ऍड अमोल सावंत यांनी विशेष गौरव समारंभात नुकत्याच दिलेले आहे.

तिन्ही विधीज्ञांनी डिसेंबर मध्ये स्पेशल ट्रेनर प्रशिक्षक न्यायाधीश प्रदीप जयस्वाल, न्यायाधीश किशोर पाटील व न्यायाधीश सचिन भाऊसार यांच्या उपस्थितीत ४० तासांच्या कार्यशाळेत प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

ऍड विक्रम वाडेकर यांनी सांगितले की या प्रशिक्षणाचा तसेच नियुक्तीचा सर्वसामान्य जनता, पक्षकार बंधू भगिनी यांचा फायदा करून देण्याचा आम्हा सर्व विधीन्यांचा मानस असून त्या उद्देशाने आम्ही न्यायदानाच्या मदतीस कार्य करणार आहोत व त्याबाबत कटीबद्ध आहोत

ऍड वाडेकर हे मोहटादेवी देवस्थान पाथर्डीचे विद्यमान विश्वस्त, तसेच माजी सदस्य अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व अहमदनगर जिल्हा नोटरीज असोसिएशनचे सचिव आहेत.

या तिघांचेही प्रधान व जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर  यार्लगड्डा, न्यायाधीश भाग्यश्री पाटील सचिव, अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर बार असोसिएशन अध्यक्ष संजय पाटील, आदींनी अभिनंदन केले आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !