बेकायदेशीर अडवणूक : 'या' स्कुलच्या दबंगगिरी विरोधात पालकांची वज्रमुठ

डवलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळा प्रशासनाने हॉलतिकीट दिले


पालकांकडून 'MBP Live24'चे आभार


'MBP Live24'च्या प्रश्नांपुढे सेंट फ्रांसिसचे धाबे दणाणले 


ऍड. उमेश अनपट (नाशिक) - लगेच फी भरा नाहीतर दहावीच्या विद्यार्थ्यांना हॉलतिकीट देणार नाही. फी भरली नाही म्हणून ओपन हाऊसच्या दिवशी शाळेत परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी आलेले विद्यार्थी व पालक यांना अपमानित करून निकाल न दाखविणे अशा प्रकारे दबंगगिरी करणाऱ्या सेंट फ्रांसिस स्कुलच्या विरोधात आज (ता : ११) पीडित पालकांनी वज्रमुठ आवळली.

पालकांच्या आवाहनानंतर MBP Live24 घटनास्थळी दाखल होताच आपली चूक सुधारण्याचा केविलवाणा प्रयत्न करत मुख्याध्यापक संजय पाटील यांनी अडवलेल्या पालकांना तात्काळ हॉलतिकीट दिले. यावेळी सेंट फ्रांसिस स्कुलच्या प्रशासनाने पालक एकजुटीच्या विरोधात अक्षरशः लोटांगण घातल्याचे प्रत्यक्षदर्शीनी अनुभवले.

विद्यार्थ्यांसमोर पालकांना अपमानित करणे, दहावीच्या परीक्षा तोंडावर आल्या असताना दहावीच्या विद्यार्थ्यांची हॉलतिकीटासाठी अडवणूक करून त्यांचा मानसिक छळ करणे, फी भरली नाही हे कारण पुढे करत ओपन हाऊसला बोलावून विद्यार्थ्यांना निकाल न दाखवणे, फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्गात बसवणे, स्वछता गृहात बसवणे अशा गंभीर तक्रारी पीडित विद्यार्थी व पालकांनी "MBP Live24"कडे मांडल्या.

तक्रारिंची शहानिशा करण्यासाठी पालकांसह 'MBP Live24' प्रतिनिधीने सेंट फ्रांसिस स्कुल गाठले. यावेळी मुख्याध्यापक संजय पाटील यांना पालकांनी जाब विचारला असता सुरुवातीला त्यांनी सारवासारव करण्याचा केविलवाना प्रयत्न करत अखेर चूक मान्य करत बेकायदेशीरपणे अडवलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना हॉलतिकीट दिले.

यावेळी "MBP Live24"ने उपस्थित केलेल्या अनेक कायदेशीर प्रश्नाची उत्तरे मुख्याध्यापक पाटील यांना देता आली नाहीत. यानंतर "पीटीए" अध्यक्ष प्रवीण जाधव यांच्यासह उपस्थित पालकांनी सेंट फ्रांसिस प्रशासनाबद्दल संताप व्यक्त करतानाच "MBP Live24"चे आभार मानले.

शिक्षण विभागाकडे दाद मागणार - 'MBP Live24'ने उपस्थित केलेल्या अनेक कायदेशीर मुद्याचा पाठपुरावा करण्याचा चंग पालक-टीचर्स असोसिएशन आणि पीडित पालकांनी बांधला आहे. त्यासाठी शिक्षण विभागाबरोबरच प्रशासन स्तरावर विविध ठिकाणी पाठपुरावा केला जाणार आहे.

विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही - कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा देण्यापासून अडवले जाणार नाही. विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही. पालकांनी देखील शाळा प्रशासनाला सहकार्य करावे. - संजय पाटील (मुख्याध्यापक)

MBP Live24शी संपर्क साधा - दहावीच्या अगर इतर विद्यार्थ्यांची सेंट फ्रांसिस कडून यापुढेही अशा प्रकारे बेकायदेशीरपणे अडवणूक झाल्यास थेट MBP Live24शी संपर्क साधावा. बातमीच्या खालील बाजूस आमचा मोबाईल नंबर दिलेला आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !