आयुष्यात अनेक क्षण असे येतात..
तिथे तडजोड करावी लागते..
तडजोड, नाईलाज, इच्छा नसताना.
वाटतं असतं सारखं...
अन्याय करतो आपणच आपल्यावर.
आपल्या विरुद्ध.
खात्री वाटतं नाही कधी.
तर कधी उगीचच
आपण आपल्याला खूप छोटे करतो.
कधी आपल्यासमोर अनुभव असतात इतरांचे,
तर कधी कुणाचा सल्ला मानावा लागतो
वाढलेला आत्मविश्वास गळून पडतो..तर कधी कुणाचा आदर असतो...शब्द महत्वाचे असतात कधी..तर कुणाचा सन्मान असतो तिथे...मन खट्टू होत असतं या विचाराने..
तर कधी नाईलाज...
आपणच आपल्या मनाविरुद्ध केलेली तडजोड...
अन्याय झालाय आपल्यावर हे माहीत असूनही..
खूप काही चांगलं निर्माण करण्याचा आत्मविश्वास असताना देखील...
स्वीकारावं लागतं...
शून्य व्हावं लागतं...!
- जयंत येलूलकर (अहमदनगर)