अहमदनगर - राज्याच्या साहित्य विश्वातील ख्यातनाम ज्येष्ठ साहित्यिक, शहरात गेल्या अनेक वर्षांपासून स्थायिक झालेले डॉ. प्रभाकर मांडे यांना नुकताच भारत सरकारचा साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा सावेडी उपनगर व महाराष्ट्र साहित्य परिषद अहमदनगर शहर शाखा यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
डॉ.मांडे यांचे साहित्य व शैक्षणिक क्षेत्रातील योगदान मोलाचे आणि अभिमानास्पद आहे. त्यांनी आपल्या विविध ग्रंथातून मांडलेले विचार, त्यांचा लोकसाहित्यातील अभ्यास आजच्या अन् उद्याच्या पिढीला मार्गदर्शक आहेत.
यावेळी डॉ. मांडे सत्काराच्या निमित्ताने बोलताना म्हणाले की मला मिळालेला "पद्मश्री" पुरस्कार माझ्या साहित्याचा सन्मान आहे. गेली अनेक वर्षे मी नगर भूमीत रहात असुन मी आता पुरता नगरकर झालो आहे.
साहित्यिक व साहित्य क्षेत्रातील काम करणारे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी झालेली भेट, सर्वांनी माझा केलेला सत्कार मला मनस्वी आनंद देणारा आहे अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. लीलाताई गोविलकर, मेधाताई काळे, डॉ. मांडे यांच्या स्नुषा वृषाली मांडे, म.सा.प पुणेचे जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत पालवे, जिल्हा वाचनालयाचे अध्यक्ष शिरीष मोडक, म.सा.प सावेडी उपनगर शाखेचे प्रमूख कार्यवाह तथा मसाप, पुणेचे जिल्हा प्रतिनिधी जयंत येलुलकर हे उपस्थित होते.
तसेच अहमदनगर शाखेचे अध्यक्ष किशोर मरकड, डॉ. सुधाकर कुऱ्हाडे, सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभ्यासक नंदकिशोर आढाव, बन्सी महाराज मिठाईचे संचालक अशोक जोशी, गणेश भगत, ज्येष्ठ छायाचित्रकार संजय दळवी, समाजसेवक नैत्रदुत जालिंदर बोरुडे, अरुण वाडेकर आदि उपस्थित होते.