एक वर्ष सरलं..
काही उमगलं, काही मिळवलं...
तर काही ओंजळीतुन हळूच निसटलं...!
जीवन असंच असतं.
काही क्षण जगायचे
तर काही शिकायचे...
ती शिदोरी असते आपल्यासाठी.
चुकाही होतात..
अजाणते पणाने होऊन जातात..
जाणीव महत्वाची.
खूप काही देत असतो..
हा सूर्य, निसर्ग.
वेचताना खूप काही देऊन जातो
कृतज्ञता महत्वाची...
स्वीकार मोलाचा...
तुम्ही आहात,
आनंदाचं भुवन आहात तुम्ही माझ्यासाठी...
नववर्षाच्या स्वागतासाठी हात जुळले
विनम्र आहे तुमच्या पुढे..
कधी दुखावला असाल...!
क्षमा करा...
एकटं जगता येत नाही.
एकट्यासाठी जगणं..
जमलंच नाही मुळात कधीही.
तुम्ही माझा आनंद आहात..
ऊर्जा आहात.
हे नवीन वर्ष आपल्या सर्वांसाठी..
सुर्य नारायणाचे रोजचं आशीर्वाद आहेत...
उद्याही प्रेमानं पाठीवर हात फिरवत जवळ घेईल...
अन्
मनातली सारी स्वप्न साकार करेन..
भरभरून...
ओंजळ पुन्हा भरून जाईल...
नववर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा...!
तुमचाच
- जयंत येलुलकर (अहमदनगर)