सावित्रीमाई, जमलंच तर आम्हा पुरुषांना माफ कर..

सावित्रीमाई...
जमलंच तर आज तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी
व्हॅटस अपवर तुझ्या जयंतीच्या स्टेस्टस ठेवणाऱ्या आम्हा पुरुषांना माफ कर.

ज्योतिबासारखे आम्ही 
कमी पडलो 
सावित्री घडवायला
ज्यांना तुझ्यामुळं
लिहिता वाचता येतंय
आणि मिळतोय मान 
आम्हा पुरुषांच्या खांद्याला खांदा मिळवायचा

पण 
आमच्या त्याच स्त्रिया 
करतायेत माती शेण
आणि चिखलाचे गोळे तयार 
अगदी आज ही
तुझ्यावर भिरकवायला
जेव्हा त्या फक्त लिहिता वाचता येत म्हणून
लिहितात आणि वाचतात

बुद्धीला अगदीच न घासता 
न विचारता लिहून ठेवलेल्या
गुलामीच्या  सत्यनारायणाच्या कथा 
अन मार्गशीर्षातले 
लक्ष्मीचे स्तवन
आणि वाटत राहतात
त्याच त्याच पुस्तकांचे 
न मिटणारे अवशेष

जे फक्त आणि फक्त
हातोहात फिरत राहतात
आणि
ती घाबरत असते 
तिला सांगितलेल्या 
तिच्याकडून होऊ शकणाऱ्या
असंख्य पापाची न संपणारी पुनरावृत्ती

बाजारात निर्मित राहते 
आवृत्ती आणि आवृत्ती
तरीही ती अजिबात
विचारत नाही प्रश्न
स्वतःलाही आणि समाजालाही
तिचं चुकतंय का म्हणून?


समाज तर ठार घाबरलाय
त्यांनी घेतलीत हातात
माती शेण चिखलाचे गोळे
नवीन होऊ पाहणाऱ्या
प्रत्येक सावित्रीवर फेकायला

पण आता नव्या सावित्रीनेच
ठरवावं
काय चुकतंय तिचं ?
जिने जगण्याचं बळ दिलं
निदान तिला तरी
मनापासून मानावं
मनापासून मानावं

- विवेक शिंदे (अहमदनगर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !