कौटुंबिक न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा जागृती कार्यशाळा

मराठी भाषेचा अभिमान प्रत्येकाने बाळगावा - न्यायाधीश नेत्रा कंक


अगमदनगर - जगामध्ये मराठी भाषेचे महत्व खूप मोठे तरी प्रत्येकाने मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे आपण मराठी भाषेत जन्म घेऊन सुद्धा मराठी भाषा विसरत चाललो आहे. मराठी भाषेचा न्यायालयाच्या कामकाजामध्ये जास्तीत जास्त कसा वापर होईल, यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहिल. न्यायालयात दावा मराठी भाषेत आणला तर न्यायनिवाडा सुध्दा मराठी भाषेतच देण्याचा प्रयत्न केला जाईल.

त्यासाठी वकिलांनी मराठी भाषेत बोलायचा प्रयत्न केला तर कामकाजही मराठीत होईल. मराठी भाषेचा वापर न्यायालयात जास्तीत जास्त व्हावा यासाठी जास्तीत जास्त न्यायालयीन कामकाज मराठी भाषेत करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन कौटुंबिक न्यायालय न्यायाधीश नेत्रा कंक यांनी केले.

कौटुंबिक न्यायालय अहमदनगर व फॅमिली कोर्ट ॲडव्होकेटस् बार असोसिएशन अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा जागृती कार्यशाळा संपन्न झाली.

यावेळी कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश नेत्रा कंक, फॅमिली कोर्ट एडवोकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. शिवाजीराव कराळे, मराठीच्या सेवानिवृत्त प्राध्यापिका व अंबिका महिला बॅकेच्या संस्थापक प्रा. मेघा काळे, आर्टस्, काॅमर्स आणि सायन्स काॅलेज कौडगावचे प्राचार्य डॉ. चं. वि. जोशी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.

सोबत उपाध्यक्ष ॲड. लक्ष्मण कचरे, राजेश कावरे, शिवाजी सांगळे, राजाभाऊ शिर्के, करूणा शिंदे, सचिन दरेकर, प्रणव आपटे, रोहित कळमकर, निलेश खैरे, रामेश्वर कराळे, शारदा लगड, सुरेश लगड, अभिजीत पुप्पाल, पिंटू पाटोळे, हरीश टेमकर, लक्ष्मण गोरे, प्रियंका शिंदे,  कौटुंबिक न्यायालयाच्या विवाह समुपदेशक सुषमा बिडवे, प्रबंधक वाईकर, कर्मचारी उपस्थित होते.

प्रा. मेधाताई काळे म्हणाल्या, मराठी भाषा ही विकासाचे व संस्कृतीचे माध्यम आहे भाषेवरून मनुष्याचे व्यक्तिमत्व सिद्ध होते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मराठी भाषेला दोन हजार वर्षाचा इतिहास आहे. यादव काळामध्ये ग्रंथ निर्माण झाले त्यातून मराठी भाषा पुढे आली.

मराठी भाषा ही विविध भाषेतील शब्दातून व व्याकरणातून निर्माण झाली आहे. संत साहित्यातून मराठी भाषेचे जतन केले मराठी भाषा वाढविण्याचे काम संतांनी केले आहे. त्यांचे कार्य खूप मोठे आहे. मराठी भाषेबद्दल प्रत्येकाने अभिमान बाळगणे गरजेचे आहे.

आजच्या युवा पिढीला मराठी भाषेचा वापर करण्यासाठी जनजागृतीची खरी गरज आहे असे त्या म्हणाल्या. प्राचार्य डॉ  चं. वि. जोशी म्हणाले, भाषा संपली की समाज व राष्ट्र संपला जातो. आत्ता मराठी किती टक्के बोलली जाते. याचा अभ्यास होणे गरजेचा आहे. प्रत्येकाने आपल्या भाषेचा अभिमान बाळगून मराठीतूनच बोलणे गरजेचे आहे.

न्यायालयीन कामकाजही मराठीतून झाल्यास नागरिकांना समजले जाईल असे ते म्हणाले. त्यांना आलेले देश विदेशातील अनेक अनुभव त्यांनी कथन केले व परदेशात सुध्दा मराठी भाषा बोलली जाते. पण महाराष्ट्रात जाणीव पुर्वक मराठीकडे दुर्लक्ष केले आहे. यात राजकिय उदासीनता सुध्दा दिसुन येते.

तसेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सरकारने व साहित्यिक व वकील मंडळी यांनी सुध्दा लक्ष घालायला हवे असे ते म्हणाले. कौटुंबिक न्यायालय वकील संघचे अध्यक्ष शिवाजीराव कराळे म्हणाले, मराठी भाषा ही संतांची भाषा आहे. तिचा झेंडा सर्व दूर अटकेपार घेऊन जायचं आहे, यासाठी सर्वांनी मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त करावा.

न्यायालयीन कामकाज नागरिकांना सोप्या पद्धतीने समजावे यासाठी मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त केला जाईल. मराठी भाषा ही गोड भाषा असून तिचा वापर युवकांनी आपल्या दररोजच्या जीवनामध्ये करावा असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. राजेश कावरे यांनी केले. प्रास्ताविक उपाध्यक्ष  ॲड. लक्ष्मण कचरे यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲड. शिवाजी सांगळे यांनी मानले.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !