नगरच्या व्यक्तीला ५० लाखांचा गंडा, थेट गुजरातला जाऊन केले आरोपीला जेरबंद

ऍड. उमेश अनपट (अहमदनगर) - शेअर ट्रेडींगच्या व्यवसायामध्ये जास्त नफा करून देण्याचे अमिष दाखवून एका व्यक्तीला तब्बल ५० लाख ६३ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. मात्र अहमदनगर सायबर पोलिसांच्या टीमने या आरोपीला थेट गुजरात राज्यातून अटक केली आहे.

रौनककुमार रमेशभाई परमार (वय २८, नोकरी, रा. मु. पो. कुवासना ता. विसनगर जि. मेहसाना, राज्य गुजरात. हल्ली राहणार रूम नं ६६, लवकुश प्लस सोसायटी, सुजातपुरा रोड कडी ता. कडी जि. मेहसाणा, गुजरात) असे आरोपीचे नाव आहे.

फिर्यादी यांना फोन करून अदित्य पटेल, दिनकरभाई मेहता, गौतम सहा, रितेश भाई अशा नावांनी फोन करून शेअर ट्रेंडीगमध्ये गुंतवणूक करून अधिक नफा मिळवून देतो, असे सांगुन यांचा विश्वास संपादन केला. तसेच ५० लाख ६३ हजार रुपयांची फसवणुक केली.

याप्रकरणी ऑक्टोबर महिन्यात अहमदनगर सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानुसार  पोलिसांनी फसवणूक आणि माहिती व तंत्रज्ञान कायदा २००० चे कलम ६६ (D) रजिस्टरी दाखल करण्यात आला होता.

पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे सायबर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांचे नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रतिक कोळी, पोलिस हेड कॉन्स्टेबल  योगेश गोसावी, उमेश खेडकर, राहुल हुसळे, पोलिस नाईक दिंगबर कारखेले, मलिक्कार्जुन बनकर, निलेश कारखेले, पोलिस कॉन्स्टेबल अरूण सांगळे यांनी तपास सुरू केला.

या गुन्ह्यामध्ये तांत्रीक विश्लेषण करून आरोपी मेहसाना, गुजरात येथील असल्याने तेथे जावून आरोपीचा सलग तीन दिवस शोध घेतला. आरोपी हे तंत्रज्ञानात कुशल असल्याने ते स्वतःची ओळख लपवत होते. वेळावेळी ठिकाण बदलत होते. मात्र महत्वाचा आरोपी रौनककुमार रमेशभाई परमार याला पकडले.

त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले हे करीत आहे. शेअर ट्रेडींगमध्ये नफा मिळून देण्याचा बहाणा करून फसवणूक करणारे गुन्हेगार हे मेहसाणा, सुरत गुजरात, इंदोर मध्यप्रदेश येथे सक्रिय आहेत. नागरिकांनी आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !