केंद्रीय गृहमंत्री पदक विजेते गणेश देशमुख बनले रोल मॉडेल : खुल्या दिलाने 'हे' सिक्रेट केले खुले

प्रजासत्ताकदिनी मरोळ पोलिस प्रशिक्षण केंद्रात सन्मान

नाशिक - केंद्रीय गृहमंत्र्यांच्या पदकावर आपले नाव कोरणारे वरिष्ठ श्रेणी लिपिक गणेश देशमुख राज्यातील पोलिस कर्मचाऱ्यांचे रोल मॉडेल बनले आहेत. अनेकांनी त्यांच्यासारखीच मजल मारण्याचे ठरवून या पदकापर्यंत पोहोचण्याचा प्रवास देशमुख यांच्याकडून आज जाणून घेतला. याबाबतचे लेखी विवेचन सोशलमिडियाद्वारे सर्वांपुढे मांडले असल्याची माहिती देशमुख यांनी MBP  Live24 शी बोलताना दिली.


केंद्रीय गृहमंत्र्यांच्या पदकावर आपले नाव कोरणारे वरिष्ठ श्रेणी लिपिक गणेश देशमुख यांना आज प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात प्राचार्य श्री प्रसाद प्रल्हाद अक्कानवरू (भापोसे ) यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. मरोळ (मुंबई ) पोलिस प्रशिक्षण केंद्रात हा कार्यक्रम पार पडला.

केंद्रीय गृह मंत्रालयामार्फत देशातील पोलीस विभागातील प्रशिक्षण संचालनायामधील सन २०२१-२२ मधील उत्कृष्ट कार्यालयीन कामकाजा करिता वरिष्ठ श्रेणी लिपीक श्री. गणेश देशमुख यांना पदक जाहीर झाले आहे.

आज (26 जानेवारी) सकाळी 8 वाजता प्राचार्य अक्कानवरू यांचे हस्ते ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रगीताद्वारे राष्ट्रीय ध्वजास मानवंदना देण्यात आली. प्रशिक्षणार्थीचे संचलन झाले. यानंतर प्राचार्य यांनी आपल्या संबोधनातून उपस्थिताना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी केंद्र व राज्यस्तरावरील पदकप्राप्त अधिकारी, अंमलदार, प्रशिक्षणार्थी यांना गौरविण्यात आले.

शुभेच्छांचा वर्षाव - आयुष्यातील अनेक खडतर प्रसंगाना खंबीरपने तोंड देऊन थेट केंद्रीय गृहमंत्र्यांच्या पदकापर्यंत उतुंग भरारी घेत यशोशिखर गाठणारे गणेश देशमुख यांच्यावर आज दिवसभर शुभेच्छांचा अक्षरशः पाऊस पडला. प्रत्यक्ष फोन करून, शुभेच्छा संदेश पाठवून, सोशल मीडियाद्वारे शेकडो हितचिंतकानी त्यांना शुभेच्छा दिल्या.

राज्य पोलिस दलात सेवा करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांनी आज गणेश देशमुख यांच्या प्रमाणेच आपल्याही सेवेचा आलेख उंचावून अशीच भरारी घेण्याची मनीषा व्यक्त केली आहे. तसेच या पदकापर्यंत मजल मारण्यासाठीची शासकीय तरतूद आणि नियमावली अनेकांनी खुद्द देशमुख यांच्याकडूनच जाणून घेतली. राज्यातील सहकारी कर्मचाऱ्यांचा उत्साह पाहून देशमुख यांनीही या पदकापर्यंत पोहोचण्यापर्यंतचा शासकीय नियमावलीचा प्रवास लेखी स्वरूपात विषद केला. तो असा...

असे पोहचा पदकापर्यंत - पोलीस विभागातील लिपिकांसाठी पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातुन सरकारी पदक (आणि तेही केंद्र सरकारचे) मिळण्याची एकमेव संधी.

1️⃣ मेडलचे नाव : Union Home Minister's Medal for Excellence in Police Training

2️⃣ पात्रता :
      १) एकूण ५ वर्षे सेवा
      २) प्रशिक्षण केंद्रात चालू दोन वर्षे सेवा आणि एकूण तीन वर्षे सेवा
      ३) न्यायिक किंवा विभागीय चौकशी चालू नसावी, शिक्षा भोगत नसावा, मागील ५ वर्षात कोणतीही शिक्षा झालेली नसावी.
      ४) मागील पाच वर्षातील ३ गोपनीय शेरे अत्युत्कृष्ट किंवा उत्कृष्ट असावेत व  उर्वरित दोन चांगले असावेत. एकही शेरा प्रतिकूल नसावा...
      ५) यापूर्वी हे मेडल मिळालेले नसावे.
 
3️⃣ मेडल मिळण्याची शक्यता :-
     १) महाराष्ट्र राज्यासाठी १८ मेडल राखीव
     २) त्यामध्ये ४०% आंतरवर्गासाठी, ४०% बाह्यवर्गासाठी व  २०% इतरांसाठी आहेत. इतरांमध्ये लिपिकांचाही समावेश होत असल्याने ३ मेडल याकरिता राखीव आहेत... (आंतरवर्ग व बाह्यवर्ग प्रशिक्षणाशिवाय इतर कामगिरी केलेले सर्व प्रकारचे अधिकारी, अंमलदार व कर्मचारी यासाठी पात्र असू शकतात. त्यामुळे हे फक्त लिपिकांसाठी आहेत असे नाही. पण त्यांना इथे संधी आहे.

7️⃣ नामांकनाचे प्रमाण :
     १) पोलीस महासंचालक प्रशिक्षण यांचे कार्यालयास प्रत्येक प्रशिक्षण केंद्राकडून आंतरवर्ग - २, बाह्यवर्ग - २, इतर - २ असे नामांकन मागवले जातात. म्हणजे इतरच्या ३ पदकांसाठी २२ नामांकने मागवली जातात.
     २) महाराष्ट्रासाठी एकूण १८ पदके असून प्रत्येक पदकासाठी ३ म्हणजे ५४ नामांकने राज्याकडून केंद्राला पाठविता येतात. यामध्ये इतर करिता ९ नामांकणाचा समावेश असू शकतो. त्यामधून ३ ची निवड केली जाऊ शकते.
 
8️⃣ पदकासाठी नामांकन होण्याची व पदक मिळण्याची जास्त शक्यता कोणाला :
१) ज्याचा सेवाभिलेख अगोदरपासूनच (प्रशिक्षण केंद्रात येण्यापूर्वीच) चांगला आहे... (यात गोपनीय शेरे अत्युत्कृष्ट असणे व बक्षिसांची संख्या जास्त असणे - भले बक्षीस ही पात्रता नाही तरीही त्यामुळे पात्रता वाढवण्यास मदत होऊ शकते.)
२) प्रशिक्षण केंद्रातील कालावधीत प्रशिक्षणासाठी उल्लेखनीय कामगिरी हातून घडणे आणि त्याची दखल वरिष्ठांनी घेणे आवश्यक आहे. कारण यासाठीच हे पदक आहे.

३) सायटेशन वजनदार होईल अशी कागदोपत्री दृश्य कामगिरी हातून घडणे आवश्यक.

अनेकांना लाभ व्हावा : गणेश देशमुख
लिपिकांमध्ये जागृती व्हावी आणि स्वतःला पात्र बनवण्यासाठी आजपासून प्रयत्न सुरू व्हावेत, जास्तीत जास्त लिपिकांना हे पदक मिळावे या भावनेने ही माहिती आज सोशलमिडियाद्वारे प्रसारित केली आहे. सोबत मूळ आधार असलेले पत्र देखील सर्वांना पाठविले आहे. राज्यातील अनेक सहकाऱ्यांना याचा लाभ व्हावा, हीच या मागील भावना आहे.

बाल कामगार केंद्रीय गृहमंत्री पदकावर नाव कोरतो तेंव्हा!
https://bit.ly/3WDpKm0

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !