काय काय हवं याची यादी
लुकलुकत्या डोळ्यांनी कश्वी सांगते.
सांतासाठी मोठ्या विश्वासाने
दाराला टांगते एक मोजा....!
मीही टांगून पहावा म्हणते..मागावा का माझ्या माणसांचा थोडासा वेळ....फक्त माझ्यासाठी...!तो देईल का सांता...मावेल का ही कामना त्या मोज्यात...फक्त थोडासा वेळ..!
कसं सांगू कश्वीला..?
कधीकधी सांताच्या हाती नसतं काहीच.
तेव्हा आपला दाराला टांगलेला मोजा
रिकामाच रहातो..
केविलवाणासा..!
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)