अहमदनगर - राहुरी फॅक्टरी येथे श्री विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्टचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील फार्मासुटीकल केमिस्ट्री विषयाचे शिक्षक भारत शिवाजी होंडे यांना पीएच. डी. पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली.
श्री. होंडे यांना डॉ. राहुल कुंकुलोळ यांचे मार्गदर्शन लाभले. प्रवरा इंस्टीट्यूट ऑफ मेडीकल सायन्स विद्यापीठ लोणी येथून औषधनिर्माणशास्त्र शाखा अंतर्गत फार्मासुटीकल केमिस्ट्री विषयातील पदवी प्राप्त केली आहे.
प्रा. भारत होंडे यांचे डॉ. बा.बा. तनपुरे सह. सा. कारखान्याचे तज्ञ संचालक डॉ. सुजयदादा विखे पाटील, डॉ. ए. एन. मिरेकर, चेअरमन नामदेव पांडुरंग ढोकणे, उपाध्यक्ष दत्तात्रय आसाराम दुस, सर्व संचालक मंडळ, सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.
तसेच संस्थेचे अध्यक्ष उदयसिंह सुभाष पाटील, उपाध्यक्ष केशवराव माधवराव कोळसे, सेक्रेटरी बी. एन. सरोदे, कॅम्पस डायरेक्टर ए. बी. पारखे, अधिक्षक डॉ. बी. पागिरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. सिरसकर, उपप्राचार्य एस. धोंडे, जगन्नाथ कोरडे, शिवाजी होंडे, यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.