तो गेला..
अनंतात विलीन झाला.
आत्मा...!
तो श्वासात होता,
बाहेर पडला..
समोर केवळ डेड बॉडी..
त्याला मोक्ष मिळो.
पणं गेला ना तो आपल्यातून...
जोडलेली नाती सोडून.
असंख्य बंध..
तो भाग होता आपल्या जगण्याचा...
रोजचं अगदी सहज भेटणं..कधी कधी कितीतरी दिवसात भेट नसायची..पण तो होता..अलीकडे, पलीकडे...आपल्या आसपास कुठेतरी होता ना..
दिलासा होता..
सुख हेचं असतं.
तो असल्याचं...
किती टप्पे पार करीत तो गेला आता थेट
एक मोठी उडी मारीत..
जन्म, बालपण, मित्र, नाती,दुःख, आनंद, तरुणाई, नोकरी,लग्न, मुले, आजारपण..हे सगळं अनुभवून,या साऱ्यांना सोडून..
नात्यांची घट्ट विण अलगद सोडवून तो गेला..
आपल्या माणसांना काही काळ दुःखात नेत,
विरह देतं...
आता तुला आठवायचं...
मागे मागे जायचं..
क्षणभर हरवायचं..
ओठावर हसू आणायचं..
हाच ना तो विरह...सूर्य उगवला..मावळला...पुन्हा नव्या तेजाने आला..पण तू गेला तो गेलाच...दुःख अनावर करीत..मनात दुःखाचं एक पान साचवून..
चल, आवरू दे यार..
"न जाने किस गलीमे जिंदगीकी शाम हो जाये...!"
- जयंत येलुलकर, अहमदनगर