योगिता सुर्यवंशी (नगर) - सन १९५० ते १९७० या सुवर्णकाळातील नावाजलेले हिंदी मराठी चित्रपट पाहण्याची संधी नगरकरांना उपलब्ध झाली आहे. दर शुक्रवारी सायंकाळी या चित्रपटांची मेजवानी पहायला मिळणार आहे.
यात दिलीप कुमार, देव आनंद, राज कपूर, राजेन्द्र कुमार, शम्मी कपूर व मधुबाला, नर्गिस, मीनाकुमारी, नूतन, बिमल रॉय, व्ही. शांताराम, बी आर चोप्रा, गुरुदत्त, विजय आनंद दिग्दर्शित याशिवाय नामवंत संगीतकारानी स्वरबद्ध केलेले चित्रपट महिन्यातील प्रत्येक शुकवारी पाहायला मिळणार आहेत.
दर शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता रेहेमत सुलेमान हॉल, सर्जेपुरा येथे मोफत दाखविले जाणार असल्याची माहिती सिनेसमिक्षक नंदकिशोर आढाव व सुरेल गायकाच्या आवाजातील दुर्मिळ ध्वनि मुद्रिकाचे संग्रहाक दिलीप अकोलकर यांनी दिली.
या उपक्रमाचा शुभारंभ शुक्रवार दि. ४ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी सहा वाजता ज्येष्ठ चित्रकार वसंत विटणकर यांच्या हस्ते रेहेमत सुलतान हॉल येथे होणार आहे. हा उपक्रम आनंद क्रिएशन प्रस्तुत ‘हमारी याद आयेगी’ या शिर्षकाने कायम सुरु ठेवण्यात येणार आहे.
या उपक्रमास प्रांजली पेस्ट कंट्रोल व आर. जे. असोसिएटस्चे सहकार्य लाभले आहे. यापुर्वी सुप्रसिद्ध सिनेहिस्टोरियन, लेखक जफर अबिद यांच्या फ़ोटो संग्रहातील देव आनंद, मधुबाला याशिवाय खेमचंद प्रकाश, अनिल विश्वास ते राहुल देव बर्मन संगीतकाराचे कृष्णधवल फोटोचे प्रदर्शन भरवले होते.
हिंदी चित्रपटातील नामवंत अभिनेते, अभिनेत्री, गानकोकिळा लता मंगेशकर, लोकप्रिय प्रेमी जोड़ी दिलीप-मधुबाला, राज-नर्गिस, देव-सुरय्या, गुरुदत्त-वहीदा व अशोक कुमार-नलिनी जयवंत, या शिवाय सुरीले जादूगर नौशाद, सी. रामचंद्र, एस डी. बर्मन, शंकर जयकिशन, ओपी नैयर, मदनमोहन यांच्या दुर्मिळ माहितीसह फोटोची प्रत्येक वर्षी दिनदर्शिका काढली आहे.
विशेष असा भारतातील पहिला उपक्रम आशा टॉकीज येथे मालक विलास करंदीकर यांच्या सहकार्याने पार पडला होता. आता दर शुक्रवारी आयोजित केलेल्या जुन्या चित्रपटांचा लाभ घ्यावा, असे आवाहन नंदकिशोर आढाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.