माणसं ओळखायला शिकायला हवं दुनियादारीत.. मग ती मित्र असोत किंवा..

जे मित्र तुमच्याशी असलेलं मैत्रीचं नातं मनापासून जपतात, त्या नात्याचा सन्मान ठेवतात. वेळप्रसंगी तुमच्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते, त्याच नात्याला जपा.


त्यांची उंची वाढण्यासाठी एक पाऊल नेहमीं तुमचे पुढें असु दे. नाहीतर, जी केवळ एक टाईमपास म्हणुन तुमच्या सोबत असतात. तुमचा द्वेष करणारी जी कोणी असतात. त्यांच्याशीही ते संबंध ठेऊन असतात. आपल्याशीही दोस्ती,  गपचुप त्यांच्याशीही..

या लोकांची आपल्या प्रेमासाठी कोणाशीही वाईटपणा घेण्याची अजिबात इच्छा नसते, अशी माणसे घातक असतात. या प्रवृत्तीच्या लोकांशी मैत्रीचं नात म्हणजे केवळ प्रदर्शन असतं
.

जे आपले खरे हितचिंतक असतात. ते कधीही असा दुटप्पीपणा करीत नाहीत. म्हणूनच एखाद्याशी मैत्री करताना हे सारे जाणून घेऊनच मैत्री करावी. तरच हे नात टिकतं असतं. नाहीतर तुम्ही नुसते वाहत जाता त्यांच्यात. तुमची भावना समजून घेणारे मित्र हवेत..

तुमच्यावर जाणीवपूर्वक कोणी त्यांच्यासमोर टीका करीत असेल. त्यात काही अर्थ नसेल तर तुमच्या मित्राला हे कदापी सहन न व्हायला हवे.. त्यावेळी तो तुमच्यासाठी चवताळून उठायला हवा. सगळ्या दरडीवर हात ठेवणाऱ्या लोकांपासून सावध रहा.. ही तुमच्या कधीही उपयोगी पडणार नाहीत.

हे लोकं सगळीकडे फक्त गुडी गुडी असतात. तुमचा उपयोग संपला की बाय करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. उगीच कोणासाठी वाहत असतो आपणं.. माणसे ओळखायला शिकायला हवं या दुनियेत. मग तो मित्र असो की नातेवाईक...!

- जयंत येलुलकर (रसिक ग्रुप,अहमदनगर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !