तीस वर्षांपूर्वी इतके डायबिटिसचे रुग्ण होते का.? मग आता हे प्रमाण इतके प्रचंड का वाढलंय.?


आज मी लिहिणार आहे हिमोग्लोबिन HB, आणि हिमोग्लोबिन A1c टेस्टविषयी.. HB A1c टेस्टचे महत्व काय आहे ?

आता HB म्हणजेच हिमोग्लोबिन हा मोलेक्युल शरीरात फुफ्फुसांतुन पेशींमध्ये ऑक्सीजन वाहून नेतो आणि आणि पेशितून कार्बन डायऑक्साईड वाहून परत फुफ्फुसात आणून सोडतो. त्यामुळे शरीरात श्वसनाची क्रिया होते. हे तर सर्वांना माहिती आहे. बरोबर ना.?

हा हिमोग्लोबिन असतो तरी काय..? तर हा असतो एक छोटा प्रोटीन कण, जो लाल रक्तपेशींच्या बाहेरील आवरणास चिकटलेला असतो.. किंवा रक्ताच्या नदितिरी ती त्याची होडीच असते म्हणाना..

हा कण दोन अल्फा गलोबिन आणि दोन बीटा गलोबीन प्रोटीन साखळ्यांचा बनलेला असतो ज्यामध्ये लोहकनांची एक गोल अंगठी बसवलेली असते जिला पोरफिरीन म्हणतात.

जोपर्यंत यातील लोहकन reduced स्थितीत (fe2+) असतात, तोपर्यंत ते ऑक्सीजन मोलेक्युलला आकर्षित करून घेतात व त्याचे पेशीपर्यंत वहन करतात. जेव्हा हा हिमोग्लोबिन oxidise होतो, तेव्हा त्याला मेथहिमोग्लोबिन म्हणतात.

त्यावेळी तो ऑक्सिजनचे वहन करू शकत नाही. त्याला अनेक कारण असतात. काही जन्मजात असतात, तर काही विषारी घटक श्वसनात आल्याने होतात. मग धाप लागणे, दमासदृश्य स्थिती निर्माण होते. कारण शरीरात ऑक्सिजन पोहोचत नाही.

दुसरी स्थिती आहे कुपोषणामुळे जर शरिरात प्रोटीन किंवा लोहाची कमतरता होत असेल, तर त्याला अनेमिया म्हणतात. खेड्यातील साठ ते सत्तर टक्के महिला, बालके तसेच शहरातही हे प्रमाण बरेच मोठे आहे. सध्या कुपोषण हा विषय बाजूला ठेवू.

कारण आपल्याला डायबेटिसशी याचा संबंध काय आहे, हे समजून घ्यायचे आहे. साधारण शरीरातील इन्सुलिनच्या कमतरतेमुळे पेशीतील ग्लुकोजचे प्रमाण वाढते व त्याचा हार्ट, किडनी व मज्जासंस्था व मेंदूवर वाईट परिणाम होतो. याला डायबेटिस म्हणतात.

आज फार मोठ्या प्रमाणात आपल्या देशात डायबेटिस चे पेशंट आहेत. HB A1c टेस्टचा उपयोग साधारण तीन ते चार महिन्यांपासून शरीरावर glycosylation चा किती वाईट परिणाम आहे, हे पाहण्यासाठी होतो. 

जर हे प्रमाण 5.7 च्या आत असेल तर तुम्ही नॉर्मल आहात. जर 5.7 ते 6.4 असेल, तर तुम्ही prediabetic म्हणजे डायबिटिसच्या दरवाजात आहात. याकाळात तुम्हाला योग्य ती काळजी घेवून टाईप 2 डायबिटिस दूर ठेवता येईल. पण जर हे प्रमाण 6.4 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही डायबेटिक आहात.

म्हणून सर्वसाधारणपणे पस्तिशीनंतर आणि चाळिशीनंतर एकदा ही टेस्ट नक्की करून घ्यावी. खाण्यामध्ये अस्कॉर्बिक एसिड किंवा लिंबू नियमित ठेवल्यास हिमोग्लोबिनचे कार्य सुधारते. कारण अस्कोर्बिक एसिड हे तिथे अँटी ऑक्सीडन्टचे काम करते.

फार खोलात जात नाही. तर मूळ म्हणजे इन्सुलिन तयार करणारी प्यांक्रियाज ग्रंथी सुरक्षित कशा राहतील, याची काळजी घेतली पाहिजे. शरीरात अन्नातून जाणारे  पेस्टीसाइड व इन्सेक्टीसाईडचे अंश शरीरात अनेक दोष निर्माण करत आहेत.

तीस ते चाळीस वर्षांपूर्वी इतके डायबिटिसचे रुग्ण पाहायला मिळत होते का.? मग हे प्रमाण इतके प्रचंड का वाढले आहे.? याचा सारासार विचार देखील आपण केला पाहिजे.

- डॉ. मानसी पाटील
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !