'अशा' पद्धतीने शेती करा, मग तुम्हीही करोडपती व्हाल..

सोयाबीनपासून 'सोया चंक्स' तयार करणारी फॅक्टरी किती शेतकऱ्यांची आहे ? आज आंतरराष्ट्रीय बाजारात वनस्पतीपासून बनवलेला चिकनच्याच चवीचा पदार्थ, ज्याला 'वेजीटेरियन चिकन मिट' असे म्हणतात.

सध्या या उत्पादनाची मागणी वाढत आहे. तो सोयाबीन व इतर काही वनस्पती पासून बनवता येतो. अशा Processed food industry कडे शेतकऱ्यांनी एकत्रित लक्ष दिले पाहिजे. जिथे तुमच्या एक रुपयाचे दहा रुपये होतात. किंबहुना जास्तच होतात. अशा अनेक उद्योगांची फार मोठी यादी आहे.

उदाहरणार्थ बायो सीएनजी. त्याकडेही वळले पाहिजे. फार कमी लोक याचा फायदा घेतात. त्यामुळे गरीब श्रीमंत दरी वाढत जाते. सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येवून काम करायचे ठरवले, तर प्रत्येक शेतकरी करोडपती होईल, असे माझे वैयक्तिक मत आहे. तरीही कष्ट प्रत्येकाला करावेच लागणार.

आणि नवनवीन वाटा शोधणे, येईल त्या प्रत्येक संकटावर मिळून मात करणे, आणि तांत्रिक व मूलभूत अभ्यास परिपूर्ण असणे अत्यंत गरजेचे आहे. तरच शेती करणे फायद्याचे ठरणार आहे.

- डॉ. मानसी पाटील (पुणे)

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !