मनोरंजन - गणेश चतुर्दशीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या चित्तथरारक मराठी वेबसिरीज 'माईंड गेम'चा उर्वरित थरार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. एम. के. स्टुडिओ निर्मित 'माईंड गेम'च्या सुरुवातीच्या पाच एपिसोडला प्रेक्षकांनी अफाट पसंती दिलेली आहे.
'नेम' असा धरायचा की शेवटपर्यंत कळलं नाही पाहिजे, 'गेम' कोणाचा होणार, या टॅगलाईनने आणि चित्तथरारक ट्रेलरमुळे 'माईंड गेम' या वेब सिरीजबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. तसाच उत्स्फूर्त प्रतिसाद या वेब सिरीजला मिळाला आहे.
वर्षा (योगिता सुर्यवंशी) नावाची एक तरुणी गावाकडून शहरात तिच्या मैत्रिणीकडे राहायला येते. पण मैत्रिणीच्या घरात तिच्याऐवजी एक अनोळखी तरुण एकटाच राहत असल्याचे तिला दिसते. त्याच्याकडे मैत्रिणीबद्दल विचारणा केली, तेव्हा तोही उडवाउडवीची उत्तरे देतो. घरात रक्ताचे थेंब दिसतात, म्हणून वर्षाला संशय येतो.
'माईंड गेम'च्या पहिलाच एपिसोड प्रेक्षकांच्या मनात प्रचंड कुतुहल निर्माण करतो. पुढच्या भागांमध्ये वर्षाचा तिच्या मैत्रिणीसाठीचा शोध, तिला एका पोलीस अधिकाऱ्याची (मंगेश बदर) मिळालेली मदत, आणि अचानकपणे घडणाऱ्या अनाकलनीय घडामोडी, यामुळे वेब सिरीजने वेग पकडला.
पाचव्या एपिसोडमध्ये मात्र ही वेब सिरीज प्रेक्षकांच्या मनातले सगळे तर्क वितर्क उधळून लावते. 'नेम असा धरायचा की शेवटपर्यंत कळलं नाही पाहिजे गेम कोणाचा होणार', या टॅगलाईनला सार्थ ठरत अचानकपणे हे कथानक प्रेक्षकांना मोठा धक्का देतं. इथेच या वेबसिरीजचे पहिले पाच भाग संपतात.
तेव्हापासून प्रेक्षकांच्या मनात 'माईंड गेम'मध्ये आता पुढे काय होणार, याबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे. या वेब सिरीजचे पुढचे भाग कधी प्रदर्शित होतात याकडे प्रेक्षकांचे आतुरतेने लक्ष लागलेले आहे. या वेबसिरीजचे दिग्दर्शक मंगेश बदर यांनी लवकरच उर्वरीत पाच भाग प्रदर्शित होत असल्याची माहिती दिली आहे.
मंगेश महादेव बदर हे या वेब सिरीजचे दिग्दर्शक आहेत. तर मच्छिंद्र धुमाळ निर्माता आहेत. यामध्ये रोहिदास मिसाळ, योगिता सूर्यवंशी-नळे, सोनाली गायकवाड, मंगेश बदर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर रहेमान पठाण व गणेश निमगिरे हे सहकलाकार आहेत.
मराठीतील आघाडीचे न्यूज पोर्टल www.mbplive24.com आणि 'MBP Live24' हे यु ट्युब चॅनल या वेबसिरीजचे मिडिया पार्टनर आहे. या पोर्टलवर आणि MBP Live24 या 'यु ट्युब चॅनल'वर आपल्याला या वेब सिरीजचे प्रत्येक ताजे अपडेट मिळत राहणार आहेत.
अत्यंत उत्कंठावर्धक 'क्राईम थ्रिलर' असलेल्या या वेबसिरीजचे पाच भाग यु ट्युबवर नक्की पहा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा, असे आवाहन 'एम. के. स्टुडिओ' आणि MBPमाईंड गेम - एपिसोड एक Live24 ने केले आहे.
खालील लिंकवर पहा माईंड गेमचे एपिसोड -