योगिता सुर्यवंशी (अहमदनगर) - नेवासे तालुक्यातील घोडेगाव येथे एका सहा वर्षे वयाच्या मुलाने नऊ दिवस नवरात्रीचे उपवास करण्याची किमया केली आहे. स्वराज अनिल बामदळे असे या मुलाचे नाव आहे.
स्वराज अनिल बामदळे हा घोडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीमध्ये शिकत आहे. तो शाळेतही अतिशय हुशार आहे. नवरात्री निमित्ताने मोठे लोक नऊ दिवस उपवास करतात, हे स्वराजने पाहिले..
ते पाहून स्वराजने देखील उपवास करण्याची इच्छा बोलून दाखवली. आणि खरोखरच नऊ दिवस चुकुनही भाजी पोळी न खाता, फक्त फराळ आणि फलाहार त्याने घेतला. तसेच ग्रामदैवत श्री घोडेश्वरी मातेचे दर्शनही घेतले.
स्वराजने नऊ दिवस नवरात्रीचे उपवास केल्याबद्दल त्याचे कौतुक होत आहे. अवघ्या सहा वर्षाच्या मुलाच्या निर्धाराने आणि मनोनिग्रहाचे त्याच्या शिक्षकांनी देखील कौतुक केले आहे.