'संयम' म्हणजे नेमकं काय ?

बरेच वेळा परिस्थितीमुळे मनावर संयम ठेवून आपण सर्व गोष्टी मोकळेपणाने बोलू शकत नाही. किंवा वय वाढत चालल्यानंतर कितीही मोकळेपणा आलेला असला, तरीही व्यवहारी वागण्याला आपण सरावलेले असतो.

आज सहज विचार आला.. आजूबाजूला लोक किती पटकन दुसऱ्याला कमी लेखतात. तेव्हा त्यांच्या नकारात्मक भावना ते नकळत जगात पसरवत असतात. त्याचा वाईट परिणामही नकळत समाजावर होत असतो.

त्यादृष्टीने पाहायला गेले तर सर्वच राजकीय व्यक्तींना कोणतीही मर्यादा नाही, असे कधी कधी मला वाटते. फक्त आपल्यामुळे निदान इतरांना त्रास होऊ नये, हा संयम देखील किती महत्वाचा असतो. पण इतकी साधी गोष्ट देखील खुप लोकांना कळत नाही.

त्याच्याकडून सकारात्मक उर्जा तर मिळणारच नाही. मग संयम म्हणजे काय.? तर आपल्याच अहंकाराशी असलेली आपली लढत म्हणजे संयम. फक्त त्याने स्वाभिमानाची पायरी ओलांडू नये.. आणि कोणाचा उपमर्द करावा इतकं वरही चढू नये..

प्रत्येकाच्या स्वतःविषयीच्या काही कल्पना असतात. ती कल्पना ते जगत असतात. किंवा दुसऱ्याने तसेच आपल्याला पहावे, अशी त्यांची धारणा असते. तरीही या मर्यादा लवचिक ठेवाव्या लागतात. कारण लोक तुम्हाला त्यांच्या चौकटीतून बघत असतात.

शेवटी सर्व काही मनोविज्ञान.. संस्कार, परिस्थिती, शिक्षक, पुस्तक, मित्र मैत्रिणी आणि बदलते सामाजिक आणि आर्थिक स्तर, यावरही अवलंबून असते. कितीही व्यक्ती विलक्षण असली तरी पूरक परिस्थिती देखील अत्यंत महत्वाची ठरते. तुम्हाला काय वाटते..?

- डॉ. मानसी पाटील (पुणे)

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !