कशाला हवा 'कॅलिफोर्निया'? गड्या, आपला गावच बरा..!

या दिवसात पहाटे पहाटे, संध्याकाळी किती आल्हाददायक वातावरण असते ना..? नवरात्री ते दिवाळी..

आकाशात केशरी रंगांची उधळण होत असलेल्या एखाद्या संध्याकाळी किल्ल्याजवळील नगर क्लबच्या रस्त्यावरून भिंगार येथील जॉगिंग पार्क रस्त्यावर फेरफटका मारायला जा.

मन मोहरुन जाईल इतक्या सुरेख, रोमेंटिक वातावरणाचा अनुभव येईल तुम्हाला. हे सुखद क्षण मनात कायम जपून ठेवाल. कशाला हवा कॅलिफोर्निया. गड्या, आपला गावच बरा..! असं तर नक्की वाटून जाईल तुम्हाला...

फिरायला आल्यावर कॅन्टोन्मेंटने व्यवस्था केलेल्या एखाद्या बाकावर बसल्यावर उठण्याची इच्छा होणारं नाही तुमची. ग्रेट. आय लव्ह नगर..! निसर्गही. सौंदर्याची उधळण करीत आपली हा बांधिलकी जपत असेल.. तर मग हे शहर तर आपलंच आहे..

याच्या सुंदरतेची कल्पनाच कधी आली नाही आपल्याला. एकदा जाऊन तर या किल्ल्याकडे..!माझा आग्रह तुम्हाला निराश करणार नाही कधी...!

- जयंत येलुलकर (अहमदनगर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !