त्यांना कुठे माहीत होतं त्यांचा धर्म कोणता आहे..?

कदाचित माझी मते सर्वांना फारशी आवडणार नाहीत. पण जात पात, धर्म यावरून भेदभाव करणे मला आवडत नाही. आणि याला काही कारणं देखील आहेत.

मनुष्य हा जन्मजात उत्सवप्रिय प्राणी आहे. कारण त्याला आनंद साजरा करायला आवडतो. मग हा सण या धर्माचा आणि तो सण त्या धर्माचा, असे काही नाही. सर्वच धर्मांचा आदर करावा.

सण उत्सव योग्य जगण्याचा मार्ग दाखवतात. कारण हे सर्व धर्म लिहिणारी माणसेच होती. आपली सर्वांची मुळ उत्पत्ती ज्या अर्ध मनुष्य - मर्कट  होमोसेपियांस पासून झालेली आहे. त्यांना कुठे माहित होत त्यांचा धर्म कोणता आहे.?

त्यामुळे एकमेकांचा आदर राखणे काळजी घेणे, आनंदी जगणे, हाच मनुष्य धर्म. कारण जो जन्माला आला तो एक दिवस मरणार, ही परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला द्यायची आहे. ती कशी ?

जे काही आपल्याला मागच्या पिढीकडून मिळाले, त्यात भर घालून ते सुंदर जगण्याचे ज्ञान पुढच्या पिढीला द्यायचे, हेच आपले मुख्य कर्तव्य असते. आपल्याला याचा विसर पडता कामा नये.

आपण जरी शरीराने मरत असलो तरी आपल्यातील पेशीत असलेल्या गुणसूत्र असतात. त्यातून माणूस अमर राहतो. कारण जे करोडो गुणसूत्र तुमच्या माझ्या शरीरात आहेत.

ती फक्त तुमच्या एकट्याचीच आहेत का ? नाहीत. त्यात तुमचे आई बाबा. आईकडचे वाडवडील, बाबांकडचे वाडवडील सर्वांचा अंश शिल्लक आहे. सर्वजण तुमच्यातच जिवंत आहेत.

जाता जाता अजून एक जबरदस्त गोष्ट सांगणार आहे. जेंव्हा सर्व भारतीय स्त्रियांचे जेनेटिक मॅपिंग केले. त्यावेळी असे लक्षात आले की गेल्या दहा हजार वर्षातील भारतीय स्त्रियांचा mitochondrial DNA बदललेला नाही.

म्हणजे काय.. सर्व स्त्रिया याच भारतातील मुल निवासी आहेत.. त्यांचा gene pool एकच आहे.. याचा अर्थ.. या सर्वांची कोणी तरी एकच जननी होती. भारत मातृसत्ताक होता.

फार फार वर्षांपूर्वी काही हजार वर्षांपूर्वी.. तुमच्या माझ्या पिढीच्या सर्वांच्या आया सर्व बहिणी बहिणी होत्या. हे सर्व समजायला वेळ लागेल.. पण समजेल तेव्हा वेड लागेल.

असो. मी मला जिथपर्यंत समजलं आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्ही गोड मानून घ्या.. आणि गणेशोत्सव उत्साहात साजरा करा. गणपती बाप्पा मोरया..! 

- डॉ. मानसी पाटील (पुणे)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !