अहमदनगर - नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे ग्रामदैवत श्री घोडेश्वरी मातेच्या कृपेने, महंत श्री भास्करगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने व श्री पांडुरंगगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य नवरात्र कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
(व्हिडिओ पहा)
श्री घोडेश्वरी सामाजिक प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सोमवार दिनांक २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत हा नवरात्र महोत्सव साजरा होणार आहे. रोज रात्री ९ ते ११ या वेळेत श्री घोडेश्वरी देवीच्या प्रांगणात कीर्तन सोहळा होणार आहे.
सोमवार दि. २६ सप्टेंबर रोजी संजय महाराज शिंदे (गंगापूर), मंगळवार दि. २७ सप्टेंबर रोजी पोपट महाराज यावलकर, बुधवार दि. २८ सप्टेंबर रोजी रामेश्वर महाराज शास्त्री (तांदळे महाराज आश्रम, घोडेगाव) यांचे कीर्तन होणार आहे.
गुरुवारी दि. २९ सप्टेंबर रोजी महेबूब महाराज शेख (सौताडा, जामखेड) यांचे, शुक्रवारी दि. ३० सप्टेंबर रोजी पांडुरंगगिरी महाराज वावीकर, शनिवार दि. १ ऑक्टोबर रोजी आदिनाथ महाराज शास्त्री (तारकेश्ववर गड) यांचे कीर्तन होणार आहे.
रविवार दि. २ ऑक्टोबर रोजी समाधान महाराज खोजेकर यांचे, सोमवारी दि. ३ ऑक्टोबर रोजी मुकुंद काका जाटदेवळेकर (पाथर्डी) यांचे, तर मंगळवारी दि. ४ ऑक्टोबर रोजी ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज यांचे कीर्तन होणार आहे.
दररोज संतपूजन, कीर्तन सेवा आणि फराळ खिचडीचे वाटप केले जाणार आहे. बुधवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत महंत भास्करगिरी महाराज यांचे शिष्य प्रकाशानंदगिरी महाराज (देवगड) यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. यानंतर महाप्रसादाचे वाटप होणार आहे.
घोडेगाव आणि पंचक्रोशीतील भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री घोडेश्वरी सामाजिक प्रतिष्ठान आणि समस्त घोडेगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.