सहज मिळणारे व खिशाला परवडणारे 'हे' फळ खा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा

आज आरोग्याची पोस्ट लिहिण्याचा विचार होता. अशी कोणती अत्यंत उपयुक्त फळभाजी आहे जी सौंदर्य, आहार आणि औषधी म्हणून देखील वापरता येईल.. आणि नजरेसमोर आली पपई.

पपई सर्वगुण संपन्न आहे. कारण एक आहार म्हणून पपई मधे A, B, C, E अशी वेगवेगळ्या प्रकाराची व्हिटॅमिन सापडतात. तसेच नैसर्गिक क्षार फ्रुक्टोज शुगर आणि पाचक इंनझाइमसनी युक्त असतात.

माझ्या अनुभवाने ज्याना प्रथिने संदर्भात पचनाच्या तक्रारी असतात. त्यांनी एखादा पपयीचा तुकडा खाऊन जेवायला बसावे कारण पेप्टेज सारखे महत्वाचे पाचक एन्झ्याम यात आहे. जेवणाचा शेवटचा घासही पपई खाऊन उठावे.

पपई मधील घटक human immunity system मधील टी सेल्स ॲक्टिव करतात.. त्यामुळे प्लेटलेटची संख्या वाढते व रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

यामुळे सर्वसाधारणपने डेंग्यू, चिकनगुण्या झाल्यानंतर पपई खाण्याचा तसेच पपईच्या पानाचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो. केरिया पपया ही गोळी देखील पपयाच्या पानापासून बनवलेली असते.

पपईमधील सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीने उपयोगही महत्वाचा आहे. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी पपइचा तुकडा चेहऱ्यावर घासावा व वीस पंचवीस मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून टाकावा.

यामुळे चेहर्यावरील तसेच शरीराच्या इतर अंगावरील सुरकुत्या कमी करता येतात. Anti-aging enzyme उपयोगी पडतात. पपई सहज उपलब्ध होणारे व खिशाला परवडणारे फळ आहे. ते तुमच्या रोजच्या फळांच्या बकेटमधे नक्की असू द्या.

- डॉ. मानसी पाटील (पुणे)

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !