तुमच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना (Driving License) आहे ? नसेल तर 'हे' वाचा..

अहमदनगर - उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मोटार वाहन निरीक्षकांचा सप्टेंबर महिन्याचा मासिक दौरा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. हा दौरा पुढीलप्रमाणे आहे.

जामखेड ५ सप्टेंबर, शेवगाव ६ सप्टेंबर, कर्जत ७ सप्टेंबर, पारनेर ८ सप्टेंबर, श्रीगोंदा १२ सप्टेंबर, चौंडी १३ सप्टेंबर आणि पाथर्डी १४ सप्टेंबर, २०२२. प्रत्येक तालुक्यात मासिक दौऱ्याचा दिवस हा नमुद दिनांकाप्रमाणे असेल.

ज्या दिनांकाचे दिवशी सार्वजनिक सुट्टी असेल किंवा शासकीय सुट्टी जाहीर होईल. तसेच प्रशासकीय कारणास्तव दौरा रद्द झाल्यास त्या दिवसाच्या मासिक दौऱ्याचे कामकाज दुसऱ्या सोईस्कर दिवशी होईल व त्याची तारीख जाहीर करण्यात येईल.

अर्जदारांची अपूर्ण कागदपत्रे कोणत्याही परिस्थितीत स्विकारली जाणार नाहीत. कॅम्पचे सर्व कामकाजाबाबत शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरणे बंधनकारक राहील. दोऱ्याच्या ठिकाणी परराज्यातून आलेली वाहने (RMA) तसेच बसेस तपासणी केली जाणार नाहीत.

ज्या तालुक्यात कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे त्या तालुक्यातील नागरीकांचे कॅम्पमध्ये कामकाज करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे अहमदनगरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी सांगितले आहे.

शिबीर कामकाज ठिकाणी तपासणी होणाऱ्या सर्व नवीन तात्पुरती नोंदणी झालेल्या परिवहनेत्तर संवर्गातील वाहनांचे डिस्क्लेमर असल्याशिवाय वाहनांची तपासणी करण्यात येणार नाही.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !