योगिता सुर्यवंशी (अहमदनगर) - येथील एशियन नोबल हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड हे जिल्ह्यातील उच्च गुणवत्ताधारक हॉस्पिटल बनले आहे. क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाकडून या हॉस्पिटलला सर्वोच्च गुणवत्ताधारक (एनएबीएच) अशी मान्यता भेटली आहे, अशी माहिती हॉस्पिटलचे प्रमुख वैद्यकीय संचालक डॉ. बापूसाहेब कांडेकर यांनी दिली आहे.
'एनएबीएच' म्हणजे 'हॉस्पिटल आणि हेल्थ केअर प्रदात्यासाठी राष्ट्रीय मान्यताप्राप्त मंडळ' असा आहे. एशियन नोबेल हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड ने विविध प्रकारचे राज्य सरकार तसेच क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाकडून राष्ट्रीय मान्यता असलेले विविध मानांकने प्राप्त केलेली आहेत.
यामध्ये गुणवत्तेसाठी ISO 9001, पर्यावरण संदर्भात ISO 14001, आरोग्य आणि सुरक्षिततेचे OHSAS 18001, क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाकडून NABH पूर्व प्रवेशस्तर आणि आता क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (दिल्ली) कडून NABH पूर्ण मान्यता यांचा समावेश आहे.
सुमारे २४ वर्षांपूर्वी डॉ. बापू कांडेकर आणि डॉ. संगीता कांडेकर यांनी गरजूंची सेवा करण्यासाठी पूर्ण निष्ठेने आपली कारकीर्द सुरू केली. आधुनिक तंत्रे, अत्यंत सक्षम व अनुभवी डॉक्टर्स, पूर्ण प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ सोबत घेत हे रुग्णालय उभे केले.
पूर्ण समर्पित आणि कार्यक्षम पॅरामेडिकल स्टाफद्वारे जवळजवळ सर्व आरोग्य समस्या, रोग आणि विकारांवर योग्य आजारांवर एकाच छताखाली उपचार करणे ही एशियन नोबल हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडची लक्षवेधी वैशिष्ट्ये आहेत.
हॉस्पिटल अँड हेल्थ केअर प्रोव्हायडर्ससाठी राष्ट्रीय मान्यता मंडळ (NABH) ने एशियन नोबेल हॉस्पिटलला ५ वी नवीनतम आवृत्ती नुसार दि. ११ ऑगस्ट २०२२ पासून गुणवत्ता आणि सुरक्षा मानंकनाची पूर्ण प्रमाणित मान्यता दिली आहे.
हे प्रमाणपत्र असे स्पष्ट करते की हे हॉस्पिटल रूग्णांच्या सुरक्षिततेच्या आणि काळजीच्या गुणवत्तेच्या संदर्भात बोर्डाने निश्चित केलेल्या कठोर मानकांची पूर्तता करते. तसेच सर्व सुविधा, सेवा, गुणवत्ता आणि सुरक्षा मानकांची पूर्तता करते.
एनएबीएच अंतर्गत वैशिष्ट्य - रुग्णांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता असेल. रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या हक्कांचे रक्षण करणे आणि त्यांना उपचाराच्या प्रत्येक टप्प्याची माहिती देणे. उच्च पात्र व्यावसायिक कर्मचाऱ्यांसह आंतरराष्ट्रीय स्तरावरील आरोग्य सेवा देणे, असे हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश्वर सुर्यवंशी यांनी सांगितले आहे.
तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मानकांच्या बेंच मार्कचे पालन करणे. आमचा प्रामुख्याने रुग्णांच्या समाधानावर लक्ष केंद्रित करून सतत गुणवत्ता सुधारणे. कमी आर्थिक स्थिती लक्षात घेत सर्व रुग्णांना समान वागणूक देणे.हेल्थ केअर विभागात एशियन नोबेल हॉस्पिटल बनले सर्वोत्कृष्ट गुणवत्ताधारक.