मुंबई - पुणे नाशिक सेमी हायस्पिड रेल्वेमार्गाला निती आयोगाने एप्रिल २०२२ मध्ये मान्यता दिली आहे. तर केंद्राच्या अर्थविषयक व्यवहार मंत्रिमंडळ समितीची मान्यता बाकी आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच वॉर रूममध्ये आढावा घेतला.
यासाठी देखील खासगी जागेचे भूसंपादन, शासकीय व वन जमिनीचे हस्तांतरण या बाबींना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
या व्यतिरिक्त पुणे मेट्रो, पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळ, नागपूर येथील मेट्रो तसेच विमानतळ या कामांबाबत देखील या वॉर रुम बैठकीत चर्चा होऊन मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांनी कार्यवाहीचे निर्देश दिले.
या बैठकीला मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, नॅशनल हाय स्पीड रेल्वे कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र प्रसाद, एमएमआरडीए आयुक्त, जिल्हाधिकारी, तसेच संबंधित विभागांचे सचिव उपस्थित होते.