अहमदनगर - शहरातील ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार जितेंद्र अग्रवाल (वय ५४ वर्षे) यांचे शुक्रवारी (दि. २६ ऑगस्ट) निधन झाले. ह्रद्यविकाराचा झटका आल्याने ते सावेडी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते.
उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत माळवली. त्यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले. उत्तम छायाचित्रकार म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांना उत्कृष्ट छायाचित्रणाचे विविध पुरस्कार देखील मिळाले आहेत.
विविध वृत्तपत्रात त्यांनी छायाचित्रणाचे काम केले. इलेक्ट्रॉनिक मिडियात कार्यरत असलेले सचिन अग्रवाल व अमर अग्रवाल यांचे ते मोठे बंधू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई, दोन भाऊ असा परिवार आहे.
सर्वांच्या मदतीला धावून जाणारे व मनमिळावून स्वभावाने ते सर्वांना सुपरिचित होते. त्यांच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.