सोन्या मोत्यापेक्षाही आयुष्य महाग,
सौंदर्यापेक्षाही कर्तृत्व मौल्यवान
नाती गुंफण्याची कला शिक,
फार गरज त्याची गड्या..
कोसू नको गेलेल्या वेळेला,
उरलाय त्या वेळेला खास बनव
जिंदगी समजली नाय कुणाला अजुन
तु खुळ्यासारख वागू नको गड्या..
गैरसमज होतात जीवनात,
तु लवकर समजदार हो
उठून दिसशील सगळ्यात,
नाही जमत कुणाला एवढ गड्या..
हास. खेळ. बागड..
त्रासाला दुर्लक्ष कर
जन्माच्या शेवटी मरणं
तोवर तरी जगून घे गड्या..
- शुभांगी माने (काष्टी, अहमदनगर)