मनोरंजन - 'नेम' असा धरायचा, की शेवटपर्यंत कळलं नाही पाहिजे 'गेम' कोणाचा होणार.? या 'टॅगलाईन'सोबत 'माईंड गेम' या नव्या कोऱ्या मराठी वेब सिरीजचा ट्रेलर युट्युबवर नुकताच प्रदर्शित झाला आहे. मनोरंजन क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या 'एम के स्टुडिओ'ने या थरारपट वेब सिरीजची निर्मिती केली आहे.
आता लवकरच युट्युबवर ही वेबसिरीज प्रेक्षकांना मोफत पाहण्यासाठी उपलब्ध होत आहे. एम के स्टुडिओची निर्मिती असलेल्या 'वेब सिरीज'ना यापूर्वीही प्रेक्षकांनी अफाट प्रतिसाद दिलेला आहे. आता 'माईंड गेम' ही मराठीतील एक नवी कोरी 'वेब सिरीज' दाखल होत आहे.
'नेम' असा धरायचा की शेवटपर्यंत कळलं नाही पाहिजे 'गेम' कोणाचा होणार.. या 'टॅगलाईन'सोबत 'माईंड गेम' या वेब सिरीजचे पहिले मोशन पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाले होते. या 'टॅगलाईन'मुळे प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे.
हा ट्रेलर पाहिलात का ? - रक्तरंंजित थरारपट असलेल्या मराठी वेबसिरीजचे पार्श्वसंगीत प्रचंड उत्सुकता निर्माण करणारे आहे. त्यामुळे अल्पावधीतच या ट्रेलरला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. युट्युबवर प्रदर्शित झालेल्या या ट्रेलरला अनेेकांची वाहवा मिळत आहे.
मंगेश महादेव बदर हे या वेब सिरीजचे दिग्दर्शक आहेत. तर मच्छिंद्र धुमाळ निर्माता आहेत. यामध्ये रोहिदास मिसाळ, योगिता सूर्यवंशी-नळे, सोनाली गायकवाड, मंगेश बदर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर रहेमान पठाण व गणेश निमगिरे हे सहकलाकार आहेत.
विशाल सरोदे यांनी या वेब सिरीजचे एडिटिंग केले आहे. रोहिणी फडतरे यांनी मेकअपची जबाबदारी पाहिली आहे. रुशिकेश मिंडे, आदित्य माने, महेश नाईक, चैतन्य साळुंके, साई माने, राजु चांदगुडे, आदींनी तांत्रिक बाजू मोठ्या ताकदीने सांभाळल्या आहेत.
मराठीतील आघाडीचे न्यूज पोर्टल www.mbplive24.com आणि 'MBP Live24' हे यु ट्यूब चॅनल या वेबसिरीजचे मिडिया पार्टनर आहे. या पोर्टलवर आणि MBP Live24 या 'यु ट्यूब चॅनल'वर आपल्याला या वेब सिरीजचे आणखी ताजे अपडेट मिळत राहणार आहेत.
अतिशय उत्कंठावर्धक 'क्राईम थ्रिलर'पट असलेली ही वेब सिरीज लौकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वेबसिरीजचे मोशन पोस्टर, टीजर आणि ट्रेलर तुम्हाला कसे वाटले, हे नक्की कळवा आणि आवडल्यास आपल्या मित्रांना पाठवा, असे आवाहन 'एम. के. स्टुडिओ'ने केले आहे.