आपला भारत देश दि. १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटीश राजवटीतून स्वतंत्र झाला. यावर्षी स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण हिंदुस्तानात साजरा होत आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशके लोटली असून या काळात प्रत्येक आघाडीवर देशाने जगभर आपला ठसा उमटवला आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, आर्थिक, कृषी, शिक्षण, साहित्य, क्रीडा अशा सर्वच आघाड्यांवर भारताने उल्लेखनीय प्रगती केली आहे.
अणु-सक्षम देश असलेल्या आपल्या देशाने अंतराळ क्षेत्रातही मोठे यश संपादन केले आहे. भारताने विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात मोठी मजल मारली आहे. भारताच्या विकासाचा हा झेंडा जगभर असाच फडकत राहो.
जय हिंद... जय भारत !
सर्व देश प्रेमी भारतीय नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🇮🇳
- ऍड. उमेश अनपट
(मुख्य संपादक, MBP Live24)