अहमदनगर - महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा सावेडी उपनगर, अहमदनगर व शांतीकुमार फिरोदिया मेमोरिअल फाउंडेशन द्वारा वारसा दिवाळी अंक प्रकाशित होत असतो. या अंकासाठी कविता, लेख आदी साहित्य पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
म.सा.पच्या सावेडी उपनगर शाखेचे अध्यक्ष व अंकाचे संपादक नरेंद्र फिरोदिया यांनी हे आवाहन केले आहे. गेल्या आठ वर्षांपासून प्रकाशित होत असलेला वारसा दिवाळी अंक त्याच्या दर्जा व गुणवत्तेबद्दल सतत चार वर्षे प्रतिष्ठेच्या विविध प्रथम राज्यस्तरीय पुरस्कारांचा मानकरी ठरला आहे.
या अंकामधे राज्यातील मान्यवर साहित्यिकांच्या साहित्याचा समावेश असतो. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील लेखकांच्या कविता, लेखास योग्य व्यासपीठ मिळावे, त्यांच्यातील गुणवत्तेचे कौतुक व्हावे. या हेतूने त्यांच्या साहित्याचा समावेश असतो.
अल्प कालावधीतच साहित्य विश्वात वारसा अंक सर्व दूर पोहोचला आहे. सावेडी उपनगर शाखेच्या माध्यमातून मराठी भाषेच्या विकासासाठी प्रयत्न करताना विभागीय साहित्य संमेलन, कविसंमेलन, साहित्यिकांना पुरस्कार, शाळेतील विद्यार्थ्यांना मराठी कथा, कवितेच्या पुस्तकांची भेट दिली जाते.
विद्यार्थी साहित्य संमेलन,शाळेमध्ये "लेखक तुमच्या दारी" अशा विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन केले आहे, अशी माहिती शाखेचे प्रमूख कार्यवाह जयंत येलुलकर यांनी दिली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी शाखेने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला आहे.
नुकतेच शाखेने शांती कुमार फिरोदिया मेमोरिअल फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित केलेल्या काव्य, लेख स्पर्धेस राज्यातूनच नव्हे तर जगभरातील मराठी साहित्य प्रेमींचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. वारसा दिवाळी अंकाचे महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, तसेच साहित्यिक, रसिकांनी भरभरून कौतुक केले आहे.
साहित्यिकांनी आपले दर्जेदार लेख,?कविता सुंदर हस्ताक्षरात खालील पत्त्यावर पाठवावेत. किंवा व्हॉट्स ॲप वा इमेल करावेत. अंकात साहित्य प्रकाशित करण्यासाठी नेमलेल्या समितीचा निर्णय अंतिम राहील.असेही येलुलकर यांनी सांगितले.
पत्रव्यवहाराचा पत्ता - जयंत येलुलकर, आदिती अपार्टमेंट (ए), रेणावीकर शाळेजवळ, प्रगती डेअरी शेजारी, सावेडी, अहमदनगर 414003
ई मेल - jayant.yelulkar@gmail.com
मोबाईल- 9822096961