आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपला स्वतःचा एखादा तरी अध्यात्मिक गुरु असतोच. गुरु हा ठरवून किंवा मागून मिळत नाही. ती एक अनुभूती असते. ती सर्वांनाच सहजासहजी घडतेच असे नाही.
मला वाटतं गुरु ही एक संकल्पना आहे. "जो जो देखील गुण तया मी गुरु केला" ती संकल्पना सजीव किंवा निर्जीव रुपात आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात असावी पेक्षा असतेच. म्हणजे बघा ना लहानपणी आपले आई-वडील हेच आपले गुरु असतात.
आई-वडील दोघेही नोकरी किंवा काम-धंदा करीत असतील तर पाळणा घरातील यशोदा माई हीच आपले गुरु होऊन जाते. आपली मोठी भावंडे हे देखील कुठ न कुठ शिकवणीतून आपल्या गुरु होऊन जातात. शाळेत जायला लागल्यावर शाळेतील शिक्षक आपले गुरु असतात. महाविद्यालयात प्रोफेसर आपले गुरु होऊन जातात.
शेजार बाजारचे आणि शाळेतील मित्र मैत्रिणी हेही बऱ्याच अशा अंशी आपले गुरु असतात. कारण आपण जसे जसे मोठे होत जातो तसे आपले मित्र मैत्रिणी आपल्याला जास्त जवळची वाटू लागतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टी आपण एकटो किंवा याच्या उलट काही होते. मित्र मैत्रिणी आपल्याला किंवा आपल्याकडून काहीतरी शिकतात.
एखाद्या विषयात जर तो प्रवीण असेल, तर आपण त्याच्याकडून शकतो, किंवा एखाद्या विषयात आपण प्रवीण असो, तर तो आपल्याकडून शकतो, असे ज्ञानाची देवाण-घेवाण होत असते. नोकरीत कार्यालयात किंवा व्यवसायिक प्रशिक्षणासाठी आपल्याला आपल्या वरिष्ठाकडून आपला काम शिकून घेतो.
आपण आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर गुरु बनवतोच. मग तो भाग वेगळा की ज्ञान किंवा टिप्स घेणारी व्यक्ती, ज्ञान किंवा टिप्स देणारी व्यक्तीला गुरु मानते की नाही. पण मी तर म्हणेल हा नम्रतेचा किंवा आपल्यात असलेल्या जाणिवेचा भाग झाला. इथे कुठेही आर्थिक देणं-घेणं नाही.
मनापासून एखाद्याने आपल्याला चार गोष्टी शिकवल्या व त्याचा आपल्याला आपल्या कामात किंवा आयुष्यात उपयोग झाला. तर आपण त्या व्यक्तीचे मनोमन आभार मानतो. पण ते जाहीरपणे व्यक्त करणारी मंडळी फारच कमी असतात. कारण इथे त्यांच्या अहंकार आडवा येतो.
व्यक्ति तितक्या प्रकृती असो, कोणीही गर्भातून शिकून येत नाही." मुलाचे पाय पाळण्यात दिसतात" ही जरी आपल्याकडे म्हण असली, तरी कुठेतरी काहीतरी क्लिक होण्यासाठी काहीतरी घडून यावं लागतं. आणि हे त्याच्याकडून घडून आणलं जातं, तोच आपला त्या घटनेचा आपल्या अविष्कार घडून आणणारा गुरु होऊन जातो.
असे न्यूटनला एक फळ झाडावरून खाली पडताना दिसलं. मग ते खालीच का पडलं? वर का नाही गेलं? या प्रश्नाचे त्याला विचार करायला लावलं. आणि त्यातून गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. म्हणजेच झाडावरून पडलेले फळ हा न्यूटनचा गुरु असो शकतो.
गुरुदेव द्रोणाचार्य यांनी एकलव्याचे शिष्यत्व नाकारल्यानंतर एकलव्याने गुरुच्या मातीचा पुतळा बनवला. पुतळ्याला रोज नमस्कार करून गुरुचे स्मरण करून तो स्वतःच धनुर्विद्या शिकला. फक्त शिकलाच नाही तर त्यात तो निपुण पण झाला. अशी आख्यायिका आहे. इथेही एक निर्जीव वस्तूला गुरु म्हणून संकल्पना मांडली आहे.
आपण नेहमी बरीच पुस्तक वाचत असतो. त्यातूनही आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. एखाद्या लेखकाच्या विचाराचा तर आपल्या मनावर एवढा पण अंगडा पडतो की, तोही एक प्रकारे आपल्या विचारांना पॉलिश करणारा गुरुच होऊन जातो. त्यांना तर आपण भेटणं दूरच पण पाहिलेले ही नसतं.
मला विं. दा. करंदीकराची कविता आठवते.. 'देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे..'
विंदांनी मांडलेली किती सुंदर कल्पना आहे नाही ही..! म्हणजे फक्त आणि निसर्गही आपल्याला भरभरून काही ना काही देत. असतो आपण कळत नकळत यांचा आस्वाद घेत असतो. तेव्हा आपण निसर्गाची ही कृतज्ञ असली पाहिजे.
आपण निष्पाप प्रेम करायला हवं. निष्पाप प्रेम आलं पाहिजे, म्हणजे येथे वासना येत. नाही त्यांच्या प्रतिकृतीने त्या दर्शवली तरी भरून पावतो आणि त्यांच्यामध्ये असलेला हा दानाचा गुण आपल्यात अवतरायला हवा. मग हीच गुरुला खरी गुरुदक्षिणा ठरेल.
- प्रवीण कदम (समन्वयक, उडान बाल विवाह प्रतिबंधक अभियान, अहमदनगर,