काही वर्षांपुर्वी -
- तुम्ही सोशल मीडिया का वापरत नाहीत.?
- वापरतो पण कमी !
- अहो ती आजची गरज आहे.
- हो, पण वेळ मिळत नाही..
- बदलत्या जगाप्रमाणे आपणही बदलायला हवं.
- हं !
आणि आता -
- मला वाटतं तुम्ही दिवसभर सोशल मीडियावर असता.
- नाही तसं नाही.
- कधीही चेक केलं तर ऑनलाईन दिसता.
- तसं नाही जस्ट चेक करतो व क्लोज करतो. कधी कधी बघतो..
साधारण हा संवाद घरोघरी आहे. पात्र बदलतील पण आशय मात्र तोच राहील. मग प्रश्न पडतो हे योग्य की अयोग्य.? मी सर्व सोडून वेळ वाया घालवतोय का.? मी माझ्या उद्दिष्टापासून दूर तर जात नाही ना.?
मला यातून खरोखरंच ऊर्जा मिळतेय का.? स्वामी विवेकानंदजी म्हणत की, 'प्रमाणापेक्षा जास्त हे विष असतं'. मलाही हे वेळोवेळी तपासावं लागेल. मग तपासणार का ?
- विजय माळी (अहमदनगर)