रोजचा दिवस..
रोज अनुभव
रस्ता कटतोय..
अव्याहत प्रवास हा..
कधी सुखाचा..
कधी वेदनांनी भरलेला..
समोरच्या माळावर पडलेला टायर..
पडून आहे कितीतरी वर्ष..
गणेशाची घंटा वाजत असते रोजच...
कधी ऐकू येते
कधी मंदिरात भेटते..
गर्दीत दिसणारे चेहरे,
भेटत असतात अधून मधून...
गाव असंच असतं..
प्रेम तिथंच दिसतं..
वेस आहे, मंदिर आहे..
रस्त्याच्या कडेला पिंपळाचे झाड आहे...
कॉलेजच्या दिवसात
मित्र होते..
कट्ट्यावर स्वप्नांची मैफल जमायची..
काळ पुढे सरकू लागला
सोबती इकडे तिकडे विखरत गेले..
वर्तमान आशा आहे..
भूतकाळ खुणा आहेत..
भल्या बुऱ्या अनुभवांनी
जगण्याचा प्रवास सुरू आहे...
- जयंत येलुलकर (अहमदनगर)