हो...!
कधीतरी यायचंच आहे रस्त्याच्या कडेला...
हमरस्त्यावर चालताना..
प्रवास करतांना...
झाडे सोबत करायची पळत पळत...
फुले सुगंधित करायची..
क्षितिजावर विहार करणाऱ्या पक्षांनी
नाही एकटे पडू दिलं कधी...
गावातील मातीचा सुगंध,आंब्याचा मोहर
कोवळा सूर्यप्रकाश..
अन दारातील कडुनिंबाचा दरवळ...
जगण्याच्या प्रवासातील ही सारी जपणारी...
गावाची पायवाट.. यांचं जग..
वारा बोलतो.. सूर्य हसतो..
कौलारू घरात पडलेली प्रकाशाची तिरीप...
हाताला लागलेला फुलपाखराचा हळूवार स्पर्श...
इथेच गवसतो स्वर्ग...
गुलमोहर..
पानांची सळसळ होताना...
दवबिंदू ओंजळीत घेताना,
कधीतरी यायचंच आहे रस्त्याच्या कडेला...!
- जयंत येलुलकर (अहमदनगर)