जगायचं.
हे लक्षात असूदे नेहमी..
मी माझा आनंद शोधत असतो..
थोडा तरी वाटेला येतो ना..
कधी पहाटे महालावर गेलो की,
जगण्याचं सुख यापेक्षा अजून कसं असतं..
हा प्रश्न पडतोच..
डोंगरावरील पक्षांची किलबिल..
सर्वात आनंदी क्षण देतात..
मधुरता असते तिथे..
अग,
आज आपण भेटलो..
हेच खर सूख असतं..
सुख समजायला हवं..आपल्या आसपास हा आनंद दरवळत असतो..तो टिपता यायला हवा..दुसरं आहे तरी काय आयुष्यात..
एक वर्षापूर्वी दिसलंच ना आपल्याला..
किती सोन्यासारखी माणसे आपलं बोट सोडून गेली...
जगण्याचं तत्त्वज्ञान सांगणारे अनुभव होते ते सारे..
स्वीकारावे लागलेच ना..
दुःख पचवलेच ना..
कधी कधी ओसरीतील चाळीसचा बल्ब..पांढऱ्या ट्यूब पेक्षाही छान वाटत असतो आपल्याला..फ्रीज मधील पाण्यापेक्षा माठातील पाण्याचा गोडवाही अधिक असतो ना.!मातीचा सुगंध असाच..
टपोरे थेंब..
किती आपलेसे वाटतात ..!
चल, कधीतरी शाळेच्या सुट्टीत गाडीवरील कुल्फी खाण्याचा आनंद घेऊ या....!
तेच खर लाईफ होत यार...
असंही वाटून जाईल बघ तुला..
आयुष्य हे असंच असतं..कधी खळाळत वाहणाऱ्या पाण्यासारखं..तर कधी संथ वाहणाऱ्या कृष्णामाई सारखं....
- जयंत येलुलकर (अहमदनगर)