नोकरीच्या शोधात आहात ? मग ११ जुलैला 'या' रोजगार मेळाव्यात जा

अहमदनगर - शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बुरुडगांव रोड, अहमदनगर येथे सोमवार, दि. ११ जुलै २०२२ रोजी अॅप्रेंटीसशीप (आंतरवासिता) रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आयटीआय (सर्व ट्रेड) व इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रामध्ये डिप्लोमा झालेल्या उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी रविकुमार पतंम यांनी केले आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मुलभूत प्रशिक्षण व अनुषंगिक सूचना केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील तरूणांना विविध क्षेत्रात नव्याने निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे यामागील उद्देश आहे. जिल्ह्यातील १५-२० नामांकित कंपन्याचे उद्योजक सहभागी होऊन प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करणार आहेत.

इच्छुक आयटीआय (सर्व ट्रेड) व इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये डिप्लोमा झालेल्या उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in ,  https://www.apprenticeshipindia.gov.in , https://dgt.govt.in/appmela2022  या वेबसाईटवर  किंवा https://forms.gle/Jv6RDpQaSm3eQnAT6 या लिंकवर आपली नाव नोंदणी करावी.

पात्रतेनुसार उद्योजकाकडे अप्लाय करावे.अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२४१-२९९५७३५ किंवा रोजगार मेळावा समन्वयक सतिश काळे (९६५७२९२७३५) व मोहसिन तांबोळी (९६२३६५३७६१) यांच्याशी संपर्क साधावा.

इच्छुक उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करुन आवश्यक कागदपत्रांसह रोजगार मेळाव्यास स्वतः उपस्थित रहावे. असे आवाहनही रविकुमार पतंम यांनी केले आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !