अहमदनगर - जिल्हा परिषद निवडणुक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गण रचनेची अंतिम अधिसूचना २७ जून रोजी प्रसिध्द केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली आहे.
अहमदनगर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२२ साठीच्या जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गण अंतिम प्रभाग रचनेच्या प्रस्तावास नाशिक विभागीय आयुक्तांनी मान्यता दिलेली आहे.
तेव्हा याबाबतची अंतिम अधिसूचना २७ जून २०२२ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.