भारीच ! गरजू घटकातील युवक - युवतींना मिळाले 'हे' प्रशिक्षण

अहमदनगर - माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मिडीयाचा प्रभावीपणे वापर होत असताना, काळाची गरज ओळखून गरजू घटकातील युवक - युवतींना रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटेग्रिटीच्या वतीने वेब डिझाईनचे तीन दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले.

या प्रशिक्षण वर्गाला सावली संस्था, अनामप्रेम, युवान संस्था व के. जी. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. रोटरी इंटेग्रिटीच्या तिसर्‍या वर्धापन दिनानिमित्त हा सामाजिक उपक्रम घेण्यात आला. 

मार्केटयार्ड येथील द टेक हब येथे रोटरी यूथ लीडरशिप अवॉर्डस (रायला) यांच्या सहकार्याने हे प्रशिक्षण घेण्यात आले. या वेब डिझाईनच्या प्रशिक्षणात परदेशी विद्यार्थ्यांना ऑनलाइन माध्यमद्वारे शिकवणारे मुंबई येथील प्रोफेसर नम्रता मालू यांनी प्रशिक्षण दिले.

युवक - युवतींना वेबसाइट डिझाईन करण्यापासून वेब पेज बनविण्याचे शिकवले. प्रशिक्षण पूर्ण करणार्‍या युवक - युवतींना रोटरी इंटेग्रिटीचे अध्यक्ष सुयोग झंवर, प्रकल्प प्रमुख पुनीत वोहरा, राजेश परदेशी, टेक हबचे किरण गुंड यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण केले.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !