माणसाचं मोठेपण खरेतर त्याच्या साधेपणात असतं. कोणत्याही क्षेत्रात असो, कितीही उंचीवर असो, त्याचा मोठा प्रभाव असो.
पण, जेव्हा तो सामान्य माणसाच्या गळ्यात हात घालतो, सहजपणाने त्याच्याशी संवाद करतो.. आपुलकीने विचारपूस करतो.. तेव्हाच तो इतरांच्या गळ्यातील ताईत होतो.
माणसे प्रेम करू लागतात त्याच्यावर. आपला वाटू लागतो तेव्हा तो. सचिन, धोनी, हे महान क्रिकेटपटू केवळ त्यांच्या खेळामुळेच मोठे नाहीत. तर त्यांच्यात असलेला साधेपणा त्यांना देव बनवून गेला.
जी मोठी असतात त्यांना कधीही अहंकार चिकटला जात नाही. अशी माणसे समाजासाठी प्रेरणा असतात. नाहीतर, थोडी पायरी चढू दया. जातील विसरून.
ज्यांनी हात दिला. वेळप्रसंगी आधार बनली. त्यांच्याकडे ही पाहून पाठ फिरवणारे जास्त भेटतील. गंमत असते. हसू ही येतं कधी. म्हणुन ती मोठी आहेत, 'नात्यापेक्षा' ज्यांच्यात माणूसपण जिवंत आहे...!
- जयंत येलुलकर (अहमदनगर)