अहमदनगर - शनिशिंगणापूर येथील ‘श्री शनैश्चर देवस्थान ट्रस्ट’च्या विश्वस्त मंडळाने भाविकांना चौथर्यावर जाऊन तेलाभिषेक करू देण्यासाठी शुल्क आकारन्याचा निर्णय घेतला आहे. ही भाविकांची आर्थिक लुबाडणूक असल्यामुळे हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.
(व्हिडिओ पहा)
जे भाविक पाचशे रुपयांची देणगी पावती फाडू शकणार नाहीत, त्यांना अभिषेक विधी करता येणार नाही. यातून विश्वस्त मंडळ गरीब भाविकांचा शनिदेवतेवर अभिषेक करण्याचा संवैधानिक अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. ही भाविकांची आर्थिक लुबाडणूक आहे.
हा निर्णय भाविकांच्या धार्मिक अधिकारांवर गदा आणणारा, तसेच गरीब आणि श्रीमंत भाविक यांमध्ये भेदभाव निर्माण करणारा आहे, असा आरोप हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आलेला आहे.
हा निर्णय विश्वस्त मंडळाने त्वरित मागे घ्यावा, अन्यथा याला विरोध केला जाईल, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगढ राज्य संघटक सुनील घनवट यांनी दिली आहे.