अहमदनगर - सेवानिवृत्त पोलिस कल्याण संस्थेच्या वतीने पोलिसांसाठी आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. जिल्ह्यातील निवृत्त पोलीस कल्याण संस्थेच्या वतीने पोलिस मुख्यालयात नुकतेच आरोग्याच्या दृष्टीने विविध आजारांच्या समस्यावर तपासणी व मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले.
(व्हिडीओ पहा)
जिल्हा पोलिस कल्याण संस्थाचे अध्यक्ष सेवानिवृत्त सहायक पोलिस निरिक्षक निसार शेख यांनी उपस्थित सेवानिवृत्त यांच्या समस्या ऐकल्या. तसेच त्यावर त्यांनी मार्गदर्शन केले. सेवानिवृत्तचे वयोमानानुसार होणारे आजार, त्यावर घ्यावयाची काळजी यावर आहार नियंत्रण, योगा, वाचन संस्कृती, कामात व्यस्त, अश्या अनेक गोष्टी सांगितल्या.
डॉ. शाहीन शेख हेल्थकेअर सेंटर अहमदनगर यांनी विविध आजाराच्या तपासण्या केल्या. यावेळी नगर जिल्ह्यातील सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जुन महिन्यात ज्यांच्या वाढदिवस होता, त्या सर्वांचा पुष्पगुच्छ देवुन व केक कापून सत्कार करण्यात आला. मिळून मिसळून एकमेकांची विचारपूस केली. हे शिबीर खेळीमिळीचे वातावरणात पार पडले.