अहमदनगर - सलग चौथ्या वर्षीही गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज घोडेगावने आपली उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली. यावर्षी शंभर टक्के निकाल देत गुरुकुल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी केंद्रात प्रथम क्रमांक मिळवला.
अभिषेक राजेंद्र ढेरे व मृणाल आबासाहेब ठोकळ यांनी ९४ % गुण मिळवत केंद्रात प्रथम क्रमांक मिळविला. यासोबत प्रसाद प्रवीण डाके (९३%) व रोहन काळे यांनी अनुक्रमे शाळेमध्ये द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.
शाळेमधील १४ विद्यार्थी ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले. गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कुलचे अध्यक्ष विष्णू अंबादास कराळे व प्राचार्य, उपप्राचार्य व सर्व शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.