सातबारा नोंदीच्या विशेष मोहिमेत 'हा' उपविभाग अव्वल

शिर्डी (अहमदनगर) - लागवडीखाली आणण्यात आलेल्या पोटखराब शेतीक्षेत्राची सातबारा उतारा नोंद घेण्यासाठी संगमनेर उपव‍िभागात ड‍िसेबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या तीन मह‍िन्यात व‍िशेष मोहिम राबव‍ण्यात आली.


या मोहिमेत ३ हजार १६९ शेतकऱ्यांच्या १३ हजार ४०४.५१ हेक्टर पोटखराब शेतीक्षेत्राची सातबारा उतारावर लागवडीलायक, अशी नोंद घेण्यात आली आहे. या व‍िशेष कामग‍िरीत संगमेनर अहमदनगर ज‍िल्ह्यात अव्वल आहे. अशी माह‍िती संगमनेर उपव‍िभागीय अध‍िकारी डॉ. शंश‍िकांत मंगरुळे यांनी द‍िली आहे.

या व‍िशेष मोहिमेत संगमनेर उपव‍िभागातील संगमनेर तालुक्यातील १ हजार २४९ शेतकऱ्यांचे १ हजार ९२२.४८ हेक्टर पोटखराब क्षेत्र व अकोले तालुक्यातील १ हजार९२० शेतकऱ्यांचे ११ हजार ४८२.०३ हेक्टर पोटखराब क्षेत्रांची सातबारा उताऱ्यांवर लागवडीलायक अशी नोंद घेतली आहे.

संगमनेर महसूल व‍िभागाच्या या न‍िर्णयामुळे समाधानी असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त  संगमनेर व अकोले तालुक्यातील पोटखराबा वर्ग (अ) क्षेत्र लागवडीलायक आणण्यासाठी ११ जुलैपर्यंत पुन्हा मोहिम राबवण्यात येणार आहे.

ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पोटखराबा वर्ग (अ) क्षेत्र लागवडीलायक करणेकामी कार्यवाही केलेली नाही. अशा शेतकऱ्यांनी तलाठी, मंडळाधिकारी यांचेशी तात्काळ संपर्क करुन पोटखराबा वर्ग (अ) क्षेत्र लागवडीलायक करून घेण्याची पूर्तता करावी. असे आवाहनही डॉ. मंगरूळे यांनी केले आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !